लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी/भामरागड : गेल्या चार ते पाच दिवसांपासून संततधार पाऊस झाल्याने आष्टी येथील वैनगंगा नदी दुथडी भरून वाहत होती. चंद्रपूर-आष्टी मार्गावरील या नदीच्या पुलावर पाणी चढले होते. भामरागड येथील पर्लकोटा नदीच्या पुलावरही दोन दिवस पाणी होते. त्यानंतर शनिवारच्या सायंकाळपासून पावसाने उसंत घेतली. त्यामुळे रविवारी दुपारनंतर दोन्ही पुलावरील पूर ओसरला.भामरागड शहराजवळून पर्लकोटा नदी वाहते. दरवर्षीच्या पावसाळ्यात पर्लकोटा नदीला पूर येत असल्याने पुलावरील वाहतूक ठप्प पडते. गेल्या चार-पाच दिवसांपासून संततधार पाऊस असल्याने पर्लकोटा नदीच्या पुलावर पाणी होते. परिणामी दोन ते तीन दिवस वाहतूक बंद होती. आता पावसाने उसंत घेल्याने रविवारी दुपारनंतर हा मार्ग सुरू झाला.पावसामुळे आष्टी येथील वैनगंगा नदी दुथडी भरून वाहत होती. पुलावर पाणी चढल्याने रविवारी सकाळी ७.३० वाजतापासून आष्टी-चंद्रपूर मार्ग बंद झाला होता. परिणामी बांबूच्या ट्रकाची रांग लागली होती. नदी पुलाजवळ चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यानंतर सायंकाळी ५.३० वाजता पूर ओसरला.
पूर ओसरला, अनेक मार्गावरील वाहतूक सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2019 11:27 PM