लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : २०१९ च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान मतदारांमध्ये जनजागृती करण्याकरिता स्वीप कार्यक्रमाअंतर्गत कॅम्पस अॅम्बेसिडर प्रतियोगिता राबविण्यात आली होती. अंतिमत: पात्र झालेल्या स्पधेर्कांना जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या हस्ते बक्षीसांचे वितरण करून गौरवण् करण्यात आला.६ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात झालेल्या या बक्षीस वितरण सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजय राठोड, अपर जिल्हाधिकारी सुधाकर कुळमेथे, निवासी उपजिल्हाधिकारी धनाजी पाटील, निवडणूक उपजिल्हाधिकारी कल्पना निळ (ठुबे) आदी मान्यवर उपस्थित होते.जिल्हास्तरीय कॅम्पस अॅम्बेसिडर प्रतियोगितामध्ये पात्र झालेल्या स्पधेर्कांना बक्षिसाचे वितरण करण्यात आले. यामध्ये प्रथम क्रमांक कुंदन विजय शेंडे, द्वितीय क्रमांक दिक्षीत दिगांबर मेश्राम तर तृतीय पुरस्कार श्रीधर देवराव पाटील यांना मिळाले. इतर प्रतियोगीधारकांना सुद्धा प्रोत्साहनपर पुरस्कार देण्यात आले. लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभा निवडणुकीतही स्वीप अंतर्गत जनजागृती झाली पाहिजे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
मतदान जागृतीवर भर द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2019 11:57 PM
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान मतदारांमध्ये जनजागृती करण्याकरिता स्वीप कार्यक्रमाअंतर्गत कॅम्पस अॅम्बेसिडर प्रतियोगिता राबविण्यात आली होती. अंतिमत: पात्र झालेल्या स्पधेर्कांना जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या हस्ते बक्षीसांचे वितरण करून गौरवण् करण्यात आला.
ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन : कॅम्पस अॅम्बेसिडरांचा बक्षिसाने गौरव