लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जीवन अमुल्य आहे. या धकाधकीच्या यंत्रयुगात वाहनांची संख्या वेगाने वाढत आहे. युवकापासून तर वृध्दांपर्यंत सकाळपासून वाहनाचा वापर केल्याशिवाय त्यांचे भागत नाही. सुरक्षीत जीवन जगण्यासाठी रस्ता सुरक्षा विषयक नियमाचे पालन करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले.उपप्रादेशिक परिवहन कार्यालय तथा पोलिस विभाग वाहतूक शाखा गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समितीच्या सभागृहात सोमवारी ३० व्या रस्ता सुरक्षा अभियानाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी ते अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रविंद्र भुयार, महामार्ग बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता विवेक मिश्रा, राज्य परिवहन विभागाचे नियंत्रक भाऊसाहेब वाढीभस्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल ढुमे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.आपल्या देशात रस्ता अपघातात जवळजवळ १ लाख ५० हजार नागरिकांचे प्राण जातात. अपघातात जगामध्ये आपला देश अग्रकमी आहे. प्रथम सर्व कार्यालयातील अधिकारी व कर्मचाºयांनी हेल्मेट खरेदी करुन वापरण्यास प्रारंभ करावा, तसेच हेल्मेट चांगल्या दर्जाचे असावे, अशीही खात्री करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी याप्रसंगी दिले.कार्यक्रमात कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मोटार वाहन निरिक्षक व्ही.व्ही. आहेर, शफीक उचगावकर, शितल कुंभार, सिध्दार्थ वाघमारे, विजय राठोड, हर्षल बदखल, तसेच वाहतूक शाखा व उपप्रादेशिक परीवहन कार्यालयाच्या कर्मचाºयांनी सहकार्य केले. प्रास्ताविकातून उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रविंद्र भुयार यांनी रस्ता सुरक्षेविषयी मोलाची माहिती दिली. संचालन केंद्र प्रमुख राजू वडपल्लीवार यांनी तर आभार वाहतूक निरिक्षक लक्ष्मी तांबुस्कर यांनी मानले.हेल्मेट व सीटबेल्टचा वापर करा -बलकवडेवाहतूक नियमाचे अत्यंत काटेकोरपणे पालन करा. शिवाय प्रत्येकांनी हेल्मेट वापरावा आणि कारचालकांनी सीटबेल्टचा न चुकता वापर करावा, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी उपस्थितांना केले. याप्रसंगी त्यांनी वाहतूक नियम व त्याअंतर्गत वाहनधारकारवर होणाºया कारवाईची माहिती विस्तृतपणे दिली.
सुरक्षित जीवनासाठी रस्ता सुरक्षेच्या नियमांचे पालन करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 04, 2019 10:34 PM
जीवन अमुल्य आहे. या धकाधकीच्या यंत्रयुगात वाहनांची संख्या वेगाने वाढत आहे. युवकापासून तर वृध्दांपर्यंत सकाळपासून वाहनाचा वापर केल्याशिवाय त्यांचे भागत नाही. सुरक्षीत जीवन जगण्यासाठी रस्ता सुरक्षा विषयक नियमाचे पालन करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले.
ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन : रस्ता सुरक्षा अभियानाचा शुभारंभ