लोकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : सण, उत्सव भारतीय संस्कृतीचा अविभाज्य अंग आहे. आरमोरी येथील नवरात्र दुर्गा उत्सवाला केवळ जिल्ह्यातच नव्हे तर विदर्भात नावलौकिक मिळाले आहे. हा उत्सव साजरा करीत असताना ध्वनी प्रदूषणाचा इतरांना त्रास होऊ नये, याची नागरिकांनी व दुर्गा व शारदा मंडळांनी काळजी घ्यावी. शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी कायदे व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर कवडे यांनी केले.आरमोरी येथे पोलीस ठाण्याच्या वतीने बुधवारी शांतता कमिटीची बैठक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात पार पडली. याप्रसंगी ते बोलत होते. बैठकीला माजी आ. आनंदराव गेडाम, तहसीलदार यशवंत धाईत, पोलीस निरीक्षक महेश पाटील, मुख्याधिकारी सतीश चौधरी, वीज वितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता बोरकर, भाजयुमोचे तालुकाध्यक्ष पंकज खरवडे, भाजप तालुकाध्यक्ष नंदू पेट्टेवार, जिल्हा महामंत्री भारत बावनथडे, पोलीस उपनिरीक्षक वरगंटीवार उपस्थित होते.आरमोरीचा दुर्गा उत्सव शहराची शान आहे. तरीसुद्धा मंडळाच्या पदाधिकाºयांनी न्यायालयाचा निर्णयाचा आदर राखून शांततेत उत्सव पार पाडावा, असे आवाहन माजी आ. आनंदराव गेडाम यांनी केले. विसर्जनादरम्यान कोणत्याही अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये. पोलीस प्रशासनाशी समन्वय ठेवावा,असे आवाहन पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन पीएसआय शीतल राणे तर आभार पीएसआय जगदीश मोरे यांनी मानले. याप्रसंगी आरमोरी शहरातील नागरिक, तालुक्यातील दुर्गा व शारदा उत्सव मंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नियमांचे पालन करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2017 12:33 AM
सण, उत्सव भारतीय संस्कृतीचा अविभाज्य अंग आहे. आरमोरी येथील नवरात्र दुर्गा उत्सवाला केवळ जिल्ह्यातच नव्हे तर विदर्भात नावलौकिक मिळाले आहे.
ठळक मुद्देशांतता कमिटीची बैठक : आरमोरीत एसडीपीओंचे प्रतिपादन