गडचिरोली : देशातील सर्वाधिक मागास जिल्ह्यांमध्ये मोडणाऱ्या गडचिरोली जिल्ह्याच्या मुख्यालयाला रेल्वेमार्गाने जोडण्यातील वनविभागाचा अडथळा दूर झाला आहे. वडसा (देसाईगंज) ते गडचिरोली या ५२ किलोमीटरच्या रेल्वेमार्गाला वन खात्याने प्राथमिक मंजुरी दिली आहे. या नियोजित रेल्वेमार्गात ७१.७२२ हेक्टर जागा वनविभागाची येते. ही जागा सलग नसली तरी त्यात काही राखीव आणि काही संरक्षित वनाचा भाग येतो. त्या भागात वाघासह इतर वन्यजीवांचा वावर वन्यजीवासाठी धोकादायक होईल म्हणून केंद्र सरकारच्या वन्यजीव विभागाने रेल्वेमार्गाच्या कामाची मंजुरी अडवून ठेवली होती.
वडसा-गडचिरोली रेल्वेमार्गाच्या पहिल्या टप्प्यास वन खात्याची मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2019 5:20 AM