सभेला ज्येष्ठ समाजसेवक देवाजी तोफा, सामाजिक कार्यकर्ते डॉ. शिवनाथ कुंभारे, पंचायत समितीचे सभापती मारोतराव ईचोडकर, उपसभापती विलास दशमुखे, पं. स. सदस्य रामरतन गाेहणे, भाजप महामंत्री हेमंत बोरकुटे उपस्थित होते.
यावेळी आ. होळी यांनी भिकारमौशी येथील मृतक पुंडलिक निकुरे, धुंडेशिवणी येथील मृतक दयाराम चौधरी व नामदेव गुडी यांच्या परिवाराची भेट घेऊन कुटुंबाचे सांत्वन केले व त्यांना आर्थिक मदत दिली.
गडचिराेली तालुक्यातील नरभक्षक वाघाला पकडण्यासाठी शासन-प्रशासनाकडे वारंवार निवेदन, चर्चा व भेटी देऊन मागणी केली; परंतु पूर्णतः दुर्लक्ष झाल्याने वर्षभरात आतापर्यंत तालुक्यातील १२ निष्पाप लोकांचा बळी गेला.
बाॅक्स
‘त्या’ वाघाला ठार मारा
वाघाचे मानवावरील हल्ले वाढण्यासाठी पूर्णत: वन प्रशासन जबाबदार असून त्यांच्यावर कारवाई होणे आवश्यक आहे. त्यामुळे स्थानिक लोकांनी पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करावी, तसेच नरभक्षक वाघाला ठार करावे व दोषी वनाधिकाऱ्यांच्या विरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी आपण शासनाला केली असून शासनाने याची गंभीर दखल घ्यावी, अन्यथा त्यांना गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
090921\09gad_1_09092021_30.jpg
मार्गदर्शन करताना आ. डाॅ. देवराव हाेळी. साेबत पदाधिकारी.