आलापल्ली : अहेरी तालुक्यातील दोडेपल्ली जंगल परिसरात ६ मार्चच्या रात्री चितळाची शिकार करण्यात आली होती. वन विभागाने चितळाचे मांस व शिकारीसाठी वापरण्यात आलेली सर्वच साहित्य हैदराबाद येथील सेंटर फॉर सेक्युलर अँड मौलीक्युलर बायोलॉजी येथे डीएनए टेस्टसाठी सोमवारी पाठविले आहेत. चितळ शिकार प्रकरणात आजपर्यंत पाच आरोपींना अटक करण्यात आली असून दोन आरोपी अजुनही फरार आहेत. आरोपींना कडक शिक्षा व्हावी, यासाठी वन विभागाने खूणगाठ बांधली आहे. आरोपीविरोधात सबळ पुरावे न्यायालयात सादर करण्याच्या उद्देशाने ज्या ठिकाणी चितळाची शिकार झाली. त्या घटनास्थळी मिळालेले साहित्य, ज्या बैलबंडीने चितळाला दोडेपल्ली गावाजवळ आणण्यात आले व मोहाच्या झाडाच्या पानात मांस वाटप करण्यात आले. ते रक्ताने माखलेली पाने, बैलबंडीच्या पाट्यासुध्दा डीएनए टेस्टसाठी पाठविण्यात आले आहेत. त्याचबरोबर ८ मार्च रोजी रवींद्र आत्राम यांच्या घरी झडतीदरम्यान मिळालेली शिंगे, चितळाचे केस, मांसाचे तुकडे, मांस कापण्यासाठी वापरण्यात आलेले साहित्य सुध्दा डीएनए परीक्षणासाठी पाठविण्यात आले आहेत. चौकशी अधिकारी तथा उपविभागीय वनाधिकारी आर. एम. अग्रवाल यांच्या नेतृत्वात विशेष पथक सोमवारी हैदराबादला निघाले. (प्रतिनिधी)आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला४चितळ शिकार प्रकरणात पाच आरोपींना २४ मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. या आरोपींनी जमानत मिळावी यासाठी न्यायालयात अर्ज केला होता. मात्र त्यांचा अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला आहे. दरम्यान या प्रकरणातील संशयीत रवींद्र आत्राम व प्रकाश पेंदाम हे दोघेही फरार आहेत.
वन विभागाने चितळाचे मांस डीएनए परीक्षणासाठी हैदराबादला पाठविले
By admin | Published: March 15, 2016 3:22 AM