लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : अहेरी वन परिक्षेत्रातील प्राणहिता व दिना नदीच्या पात्रात सागाच्या लाकडांपासून नाव तयार करण्याच्या ठिकाणावर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी धाड टाकून सुमारे ६० हजार रुपये किमतीचे सागवानी लाकूड व अन्य साहित्य जप्त केले आहे. ही कारवाई शनिवारी करण्यात आली.प्राणहिता व दिना नदीच्या पात्रात अवैधरित्या नाव तयार केल्या जात आहेत. त्यासाठी सागवानी लाकडांचा वापर केला जात आहे, अशी गोपनीय माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांना प्राप्त झाली. त्यानुसार वन विभागाच्या पथकाने नदी पात्रात धाड टाकून कारवाई केली. घटनास्थळावरून जवळपास ६० हजार रुपये किमतीचे लाकूड जप्त केले. वन विभागाचे पथक आल्याची चाहूल लागताच वनतस्करांनी नदी पात्रात उडी मारून पलिकडे पळून जाण्यात यशस्वी झाले. घटनास्थळावर जेवनाचे डबे व अन्य साहित्य आढळून आले आहेत. जेवनाच्या डब्यांवरून आरोपींचा शोध घेतला जाणार आहे.सदर कारवाई आलापल्ली वनविभागाचे उपविभागीय वनाधिकारी नितेश देवगडे यांच्या नेतृत्वात वनपाल योगेश शेरेकर, रामाराव देवकते, वनरक्षक मालू कुड्यामी, दामोधर चिकाने, नंदकिशोर खोब्रागडे, वनमजूर गोपाल आत्राम, बंडू रामगिरवार, वाहन चालक नानाजी सोयाम यांनी केली. घटनेचा पुढील तपास फिरत्या पथकाचे वन परिक्षेत्राधिकारी डी. एस. आत्राम, मनोज चव्हाण करीत आहेत. घटनास्थळावर डोंगे बांधून ठेवण्यात आले होते. यावरून आरोपींचा शोध घेतला जात आहे.सागवानी लाकडापासून अवैधरित्या नाव तयार केल्या जात आहेत. अशी गोपनिय माहिती प्राप्त झाली. त्यावरून सापळा रचून नाव निर्मितीच्या ठिकाणावर धाड टाकण्यात आली आहे. आरोपी पळून गेले असले तरी त्यांचा शोध घेतला जाणार आहे. आरोपी निश्चितच सापडतील, अशी आशा आहे.- नितेश देवगडे, उपविभागीय वनाधिकारी, आलापल्ली वन विभाग
नाव निर्मितीच्या ठिकाणावर वन विभागाची धाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 03, 2019 1:02 AM
अहेरी वन परिक्षेत्रातील प्राणहिता व दिना नदीच्या पात्रात सागाच्या लाकडांपासून नाव तयार करण्याच्या ठिकाणावर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी धाड टाकून सुमारे ६० हजार रुपये किमतीचे सागवानी लाकूड व अन्य साहित्य जप्त केले आहे. ही कारवाई शनिवारी करण्यात आली.
ठळक मुद्देकारवाई : प्राणहिता व दिना नदीपात्रात तयार केल्या जात होत्या नाव