लोकमत न्यूज नेटवर्कअंकिसा : सिरोंचा तालुक्यातील आसरअल्ली वन परिक्षेत्र कार्यालयात महाराष्ट्र, छत्तीसगड व तेलंगणा राज्यातील वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक २५ जुलै रोजी पार पडली. या बैठकीत तिन्ही राज्यांचे वन कर्मचारी आपसात समन्वय ठेवून गस्त घालतील, असे ठरविण्यात आले.सभेला सिरोंचा वनविभागाचे उपवनसंरक्षक सुमित कुमार, उपविभागीय वनाधिकारी एस. एम. गाजलवार, आसरअपल्ली वन परिक्षेत्राधिकारी सी. एस. पाटील, बिजापूरचे उपवनसंरक्षक गुरूनाथन, भोपालपल्लीचे उपवनसंरक्षक प्रदीप सेलो, विष्णू राज, सावरडेकर, लवानिया आदी उपस्थित होते.गडचिरोली जिल्ह्याच्या सीमा छत्तीसगड, तेलंगणा राज्याला लागून आहेत. गोदावरी व इंद्रावती या नद्यांनी सीमा विभागली आहे. दोन्ही बाजूला जंगल आहे. गडचिरोली जिल्ह्यातील सागवान लाकडाचा दर्जा चांगला असल्याने येथील लाकडाची तेलंगणा व छत्तीसगड राज्यात तस्करी केली जाते. प्रामुख्याने तेलंगणा राज्यातील भोपालपल्ली हे अवैध लाकुड विक्रीचे केंद्र बनले आहे. लाकुड तस्करी थांबविण्यासाठी काही उपाययोजनांवर तिन्ही राज्याच्या अधिकाऱ्यांचे एकमत झाले. यामध्ये जंगलात एकत्रित गस्त घालणे, अवैध वृक्षतोडीची गुप्त माहिती एकमेकांना कळविले. संवेदनशील भागामध्ये अतिरिक्त वनोपज नाके व संरक्षण कॅम्प उभारणे, याबाबत चर्चा करण्यात आली. वन तस्करी कायमची थांबविण्यासाठी वन कर्मचारी सतर्क असणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने कर्मचाºयांना विशेष प्रशिक्षण देण्याविषयीसुद्धा चर्चा करण्यात आली.छत्तीसगड राज्याची सीमा इंद्रावती नदीने तर तेलंगणा राज्याची सीमा प्राणहिता, गोदावरीमुळे विभागल्या गेली आहे. या तिन्ही नद्यांमध्ये बारमाही पाणी राहत असतानाही वनतस्कर लाकडांचा ताटवा बनवून लाकडांची तस्करी करतात. त्यामुळे नदीपात्रात तीनही राज्यांचे विशेष गस्तीपथक तैनात करण्याविषयीसुद्धा सभेत चर्चा करण्यात आली.
तीन राज्यांचे वन कर्मचारी एकत्रित घालणार गस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2019 12:17 AM
सिरोंचा तालुक्यातील आसरअल्ली वन परिक्षेत्र कार्यालयात महाराष्ट्र, छत्तीसगड व तेलंगणा राज्यातील वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक २५ जुलै रोजी पार पडली. या बैठकीत तिन्ही राज्यांचे वन कर्मचारी आपसात समन्वय ठेवून गस्त घालतील, असे ठरविण्यात आले.
ठळक मुद्देवनतस्करी रोखण्याचा प्रयत्न । आसरअल्लीत पार पडली बैठक