शहरं
Join us  
Trending Stories
1
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
2
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
3
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
4
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
5
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
6
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
7
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
8
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
9
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
11
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
12
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
13
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
14
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
15
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

बनावट सुगंधित तंबाखूच्या कारखान्यावर धाड

By admin | Published: May 25, 2016 1:43 AM

आरमोरी येथील बर्डी परिसरातील एका भाड्याच्या घरात अवैधरित्या विनापरवाना बनावट सुगंधीत तंबाखू तयार करणाऱ्या....

एक लाखाचा ऐवज जप्त : अन्न व औषध प्रशासनाची कारवाईआरमोरी : आरमोरी येथील बर्डी परिसरातील एका भाड्याच्या घरात अवैधरित्या विनापरवाना बनावट सुगंधीत तंबाखू तयार करणाऱ्या कारखान्यावर गडचिरोलीच्या अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी धाड टाकून आरोपी आरीफ फत्ते मोहम्मद कासवानी याच्याकडून बनावट सुगंधीत तंबाखू, त्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य व सुपारी, असा एकूण एक लाख रूपयांचा ऐवज जप्त केला. आरमोरीत बनावट सुगंधीत तंबाखू तयार करून त्याची बेकायदेशीर विक्री केली जात असल्याची गुप्त माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली. त्यानुसार मंगळवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास अधिकाऱ्यांनी मे. आरीफ फत्ते मोहम्मद कासवानी यांच्या आरमोरी येथील विनापरवाना सुरू असलेल्या बनावट सुगंधीत तंबाखू तयार करण्याच्या कारखान्यावर धाड टाकली. दरम्यान आरीफ फत्ते मोहम्मद कासवानी हे एका भाड्याच्या खोलीत बनावट सुगंधीत तंबाखू तयार करून त्यांची पॅकींग करीत असल्याचे दिसून आले. सदर कारवाई अन्न व औषध प्रशासन विभाग गडचिरोलीचे सहायक आयुक्त एम. एच. केंबळकर यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी जी. टी. सातकर यांनी केली. सदर बनावट कारखान्याची गोपनिय माहिती अन्न व औषध प्रशासन नागपूर येथील दक्षता विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी ललीत सोयाम, प्रविन उमप यांनी गोळा केली. आरोपी कासवानी यांच्या विरोधात आरमोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. (वार्ताहर)