शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
2
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
3
“लिहून ठेवा, एक दिवस उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून निघून जातील”: रामदास कदम
4
बच्चू कडू यांचे राणा दाम्पत्यास आव्हान; म्हणाले, "पुन्हा निवडणूक घ्या..."
5
सॅल्यूट! १६ व्या वर्षी लग्न, २ मुलांसह सासर सोडलं; कौटुंबिक हिंसाचाराशी लढून 'ती' झाली IAS
6
हेमंत सोरेन चौथ्यांदा बनले झारखंडचे मुख्यमंत्री, इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत घेतली शपथ 
7
"मतदानाची वेळ संपल्यावर ७.८३ टक्के मतांची वाढ झाली कशी?", नाना पटोलेंचा निवडणूक आयोगाला सवाल
8
मी मोदी सरकारसोबत उभी ठाकणार; ममता बॅनर्जींचे भर विधानसभेत मोठे वक्तव्य 
9
Chhagan Bhujbal: देवेंद्र फडणवीस यांनी झोकून काम केलंय; ते मुख्यमंत्री झाले तर आनंदच होईल - छगन भुजबळ
10
बांगलादेशात अटक करण्यात आलेल्या चिन्मय प्रभूंशी इस्कॉनने संबंध तोडले; कोणत्याही कामासाठी जबाबदार नसल्याचे सांगितले
11
१५ हजार एकर जमीन, हजारो कोटी रुपये किंमत, पण वारस नाही, या राजघराण्याची मालमत्ता सरकारने घेतली ताब्यात
12
Ajmer Sharif: "आता चंद्रचूड प्रत्येक ठिकाणी मुलाखती देत बसलेत"; असदुद्दीन ओवेसी भडकले 
13
बांगलादेशातील इस्कॉनला मिळाला मोठा दिलासा! उच्च न्यायालयाने बंदी घालण्यास दिला नकार
14
'प्यार का पंचनामा' फेम लोकप्रिय अभिनेत्री झाली आई, लग्नानंतर दीड वर्षांनी आयुष्यात आली छोटी पाहुणी
15
शरद पवार गटाला ७२ लाख मते पण १०च जागा जिंकले, अजितदादा गटाला ५८.१ लाख मते पण ४१ जागा जिंकले
16
प्रकाश आंबेडकरांना सोबत न घेणे भोवले? मविआला २० ठिकाणी फटका; सर्वाधिक नुकसान शरद पवारांचे!
17
Blast in Delhi: राजधानी दिल्लीत मोठा स्फोट; तपास यंत्रणा अलर्ट मोडवर
18
"दिल्ली जगातील सर्वात असुरक्षित राजधानी", अरविंद केजरीवालांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल 
19
सलग दुसऱ्यांदा शेअर देतेय 'ही' कंपनी, रेकॉर्ड डेट उद्या; ५० रुपयांपेक्षा कमी किंमत
20
खळबळजनक! गुजरातमध्ये सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी रुग्णांची मुद्दाम केली अँजिओप्लास्टी

माजी जि.प. अध्यक्ष कुत्तरमारे व दोन अभियंत्यांवर गुन्हे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2020 5:00 AM

भामरागड तालुक्यातील मडवेली ते सिपनपल्ली तसेच हिंदेवाडा ते पिटेकसा या रस्त्यांची कामे जिल्हा परिषद मार्फत मंजूर करण्यात आली होती. सदर कामांचे कंत्राट माजी जि.प. अध्यक्ष प्रशांत कुत्तरमारे यांना मिळाले होते. मात्र कामे पूर्ण न करताच अधिकच्या बिलाची उचल झाल्याची तक्रार जिल्हा परिषदेला प्राप्त झाली. त्यानुसार जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी चौकशी करण्याचे निर्देश दिले.

ठळक मुद्देभामरागड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार : कामापेक्षा अधिक बिलाची उचल

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : कामापेक्षा अधिकचे बिल उचलण्याच्या प्रकरणात जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा कंत्राटदार प्रशांत कुत्तरमारे, एटापल्लीचे प्रभारी उपविभागीय अभियंता डब्ल्यू. पी. बोदलवार आणि भामरागडचे कनिष्ठ अभियंता प्रकाश शंखदरबार यांच्या विरोधात भामरागड पोलीस स्टेशनमध्ये रविवारी गुन्हे दाखल करण्यात आले.जिल्हाभरात गाजत असलेल्या या प्रकरणाची तक्रार जिल्हा परिषदेकडे प्राप्त झाल्यानंतर सर्वप्रथम लोकमतने यावरील वृत्त प्रकाशित करून लक्ष वेधले होते.भामरागड तालुक्यातील मडवेली ते सिपनपल्ली तसेच हिंदेवाडा ते पिटेकसा या रस्त्यांची कामे जिल्हा परिषद मार्फत मंजूर करण्यात आली होती. सदर कामांचे कंत्राट माजी जि.प. अध्यक्ष प्रशांत कुत्तरमारे यांना मिळाले होते. मात्र कामे पूर्ण न करताच अधिकच्या बिलाची उचल झाल्याची तक्रार जिल्हा परिषदेला प्राप्त झाली. त्यानुसार जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी चौकशी करण्याचे निर्देश दिले. चौकशी समितीने प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली असता, मडवल्ली ते सिपनपल्ली या पांदन रस्त्याचे काम अपूर्ण आढळले. या कामासाठी एकूण २९ लाख ४९ हजार ८०८ रुपयांचे बिल मंजूर करण्यात आले होते. इतर कपात वगळता कंत्राटदाराला २१ लाख ४४ हजार ९६४ रुपयांचे बिल मार्च २०२० मध्ये देण्यात आले. हिंदेवाडा ते पिटेकसा हा रस्ता ८०० मीटर लांबीचा असून त्याचेही काम न करता बिलाची उचल झाली असल्याचे दिसून आले आहे.चौकशी अहवालानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या निदेर्शानुसार जिल्हा परिषदेचे प्रभारी कार्यकारी अभियंता ललित होळकर यांनी मडवेली-सिपनपल्ली या रस्त्याच्या कामात झालेल्या गैरव्यवहाराबाबतची तक्रार रविवारी भामरागड पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली. त्यानुसार कंत्राटदार प्रशांत कुत्तरमारे, उपविभागीय अभियंता वामन बोदलवार व कनिष्ठ अभियंता प्रकाश शंखदरबार यांच्या विरोधात भादंवि ४२०, ४०९, ३४, ४६५, ४६७, ४६८, ४७१ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास ताडगाव पोलीस मदत केंद्राकडे सोपविला आहे. विशेष म्हणजे, या दोन्ही अभियंत्यांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी १२ जून रोजी निलंबित केले आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषदpwdसार्वजनिक बांधकाम विभाग