लाेकमत न्यूज नेटवर्क
सिराेंचा : सिराेंचा तालुक्यातील निवडणूक झालेल्या २७ ग्रामपंचायतीचे निकाल २२ जानेवारी राेजी जाहीर करण्यात आले. यातील आरडा ग्रामपंचायतीच्या एका जागेकडे सर्वांचे लक्ष लागले हाेते. ती जागा म्हणजे प्रभाग क्र.१ मधील सर्वसाधारण जागा हाेय. या जागेवर ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच रंगु लसमय्या रामय्या हे उभे हाेते. नऊ सदस्यीय ग्रामपंचायतीमध्ये त्यांच्या पॅनलचे पाच सदस्य अविराेध निवडून आले. दाेन जागा रिक्त हाेत्या. या दाेन जागांसाठी निवडणूक झाली. यातील एक जागा रंगु रामन्ना यांच्या पॅनलनेे जिंकली. मात्र ते स्वत: नवख्या उमेदवारांच्या लढतीत पराभूत झाले.
२० ते २५ वर्षांचा राजकारणाचा अनुभव असलेल्या जुन्या पदाधिकाऱ्याचा पराभव झाल्याने ‘गड आला पण सिंह गेला’, अशी स्थिती निर्माण झाली आहे. प्रभाग क्र.१ मधून रंगु राजेश सत्यनारायण, कुमरी नागमणी गणेश हे विजयी झाले. तसेच दुर्गम ज्याेती काेकलू, कुम्मरी नागमणी गणेश, काेठारी प्रवीणकुमार विजयकुमार, रंगु रागिणी लक्ष्मय्या आदी सदस्य बिनविराेध निवडून आले. आरडा ग्रा.पं.मध्ये तुमरी नागमणी गणेश ही महिला दाेन जागेवर बिनविराेध निवडून आली तर एका जागेवर निवडून लढवून विजयी झाली. अशा तीन जागांवर या महिलेने विजय संपादन केला. नामांकनाअभावी या ग्रा.पं.मध्ये दाेन जागा रिक्त राहिल्या आहे.