शहरं
Join us  
Trending Stories
1
"एका पक्षाच्या बळावर सरकार येऊ शकत नाही", अमित शाहांच्या विधानावर अजित पवारांचं प्रत्युत्तर!
2
सनातन धर्माची रक्षा करणे ही आमची जबाबदारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं विधान  
3
'पृथ्वीवरील सर्व खोटारडे मेले, तेव्हा राहुल गांधींचा जन्म झाला', शिवराज सिंह यांची बोचरी टीका
4
...म्हणून माजी सैनिकाने १४ दिवसांपासून डीप फ्रिजरमध्ये ठेवलाय मुलाचा मृतदेह, समोर आलं धक्कादायक कारण
5
IPL संघाच्या मालकाने खरेदी केला इंग्लडचा क्रिकेट क्लब; कोट्यवधींचा झाला व्यवहार
6
चमचम करता है नशीला बदन.... युजवेंद्र चहलची पत्नी धनश्रीचा 'स्पेशल' लूक, पाहा Photos
7
कोल्हापूरमधील मुरगूड येथे शिक्षकाने प्राध्यापिका पत्नीचा केला खून, समोर आलं धक्कादायक कारण
8
राहुल गांधींनी गोहाना जिलेबीची चव चाखली; काय आहे तिची खासियत?
9
GST संकलनात 6.5 टक्क्यांची वाढ; सप्टेंबर महिन्यात 1.73 लाख कोटींची वसुली
10
Mumbai Local: ठाकुर्ली-कल्याण मार्गावर तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वेची वाहतूक मंदावली  
11
US Election: कमला हॅरिस यांना धक्का; डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्णायक ५ राज्यांमध्ये घेतली आघाडी
12
मोसादच्या मुख्यालयावर 'Fadi-4' क्षेपणास्त्र डागले, हिजबुल्लाहचा दावा 
13
'भाऊबीजेची ओवाळणी ॲडव्हान्स देणार'; लाडक्या बहीणींसाठी अजित पवारांची मोठी घोषणा
14
कळव्यात शालेय विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा; ४० जणांवर रुग्णालयात उपचार सुरु
15
शरद पवारांनी केला करेक्ट कार्यक्रम; २२ लाख कार्यकर्त्यांसह पक्ष गळाला, विधानसभेला कुणाचा गेम?
16
छत्रपती शिवरायांचा जो उदात्त हेतू होता, त्याच अपेक्षेने पंतप्रधान नरेंद्र मोदींची वाटचाल- मुख्यमंत्री मोहन यादव
17
रशियाचे लढाऊ विमान अमेरिकेत घुसले; थोडक्यात मोठा अनर्थ टळला, पाहा धक्कादायक व्हिडिओ
18
माझा पुढचा जन्म 'या' राज्यातच व्हावा, अशी माझी इच्छा आहे; धीरेंद्र शास्त्री यांचं विधान
19
"लेबनानमधील पेजर हल्ला हा इस्रायलचा 'मास्टरस्ट्रोक', भारतात जर असा प्रयत्न झाला तर..."
20
हरियाणा निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराला धक्का; कोर्टाचा आदेश, "आत्मसमर्पण करा, अन्यथा..." 

मन्नेराजाराम परिसरात चार बसफेऱ्या सुरू

By admin | Published: September 24, 2016 3:00 AM

गेल्या दोन वर्षांपासून केवळ रस्ता चांगला नाही म्हणून राज्य परिवहन महामंडळाने बंद केलेली प्रवाशी बससेवा

पोलिसांचे सहकार्य : अडीच हजार लोकांनी श्रमदानातून दुरूस्त केला १८ किमीचा रस्तारमेश मारगोनवार  भामरागडगेल्या दोन वर्षांपासून केवळ रस्ता चांगला नाही म्हणून राज्य परिवहन महामंडळाने बंद केलेली प्रवाशी बससेवा मंगळवारपासून भामरागड तालुक्याच्या मन्नेराजाराम, भामनपल्ली परिसरात सुरू झाल्याने परिसरातील २२ गावातील नागरिकांनी जल्लोष साजरा केला. भामरागड हा राज्यपालांनी दत्तक घेतलेला तालुका आहे. मात्र या तालुक्याच्या विकासाकडे राज्य सरकारचे कायम दुर्लक्ष राहिले आहे. या तालुक्यातील मन्नेराजाराम, भामनपल्ली परिसरातील २२ गावांना जोडणारा रस्ता पूर्णत: उखडून गेला होता. त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून बसफेरी बंद झाली होती. मुख्यमंत्री पालकमंत्री यांना निवेदन देऊनही नक्षलवाद्यांच्या दबावामुळे रस्ता दुरूस्तीचे काम करण्यास कंत्राटदार तयार होत नाही. ही सबब सांगत रस्त्याची दुरूस्तीही रखडलेली होती. अखेर २२ गावातील ग्रामस्थांनी ताडगाव पोलिसांना साकडे घातले व रस्ता दुरूस्त करून द्या, अशी विनंती केली. पोलिसांनी स्वत: श्रमदान करण्याची तयारी दाखविल्यावर २२ गावातील अडीच हजार लोक श्रमदानासाठी तयार झाले व तब्बल १८ किमीचा रस्ता मुरूम, माती, दगड टाकून तयार करण्यात आला. पोलीस प्रशासनाने रस्ता तयार झाल्याची माहिती अहेरी राज्य परिवहन महामंडळाच्या आगाराला दिल्यावर मंगळवारपासून अहेरी-आलापल्ली-ताडगाव-मन्नेराजाराम-भामनपल्ली अशा साधारण चार बसफेऱ्या दिवसाला सुरू करण्यात आल्या आहेत. बसफेरी सुरू झाल्याने नागरिकांनी जल्लोष साजरा केला. ही बससेवा सुरू झाल्याने मन्नेराजाराम परिसरातील येचली, भामनपल्ली, मडवेली, मरपल्ली, झिंजगाव, मडवेली, चिचोडा, टोला, इरकडुम्मे, मोकेला, रेला, बोरीया, गोरनूर, पडतमपल्ली, कसनसूर, पल्ली, जुमाबाई, लंकनगुडा, रायगुडा, बासागुडा, गेर्रा, सिपनपल्ली, दुब्बागुड्डा, पल्ली गावातील लोकांना बस सेवेचा लाभ मिळणार आहे.