लोकमत न्यूज नेटवर्कपेरमिली : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मेडपल्ली येथे मागील दहा वर्षांपासून वर्गखोलीचे बांधकाम अपूर्ण आहे. त्यामुळे एकाच वर्गखोलीत चार वर्गाच्या विद्यार्थ्यांना बसवून अध्ययन करावे लागत आहे.पेरमिली केंद्रांतर्गत येत असलेल्या मेडपल्ली जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत २००७-०८ या वर्षात एका वर्गखोलीच्या बांधकामाला सुरूवात करण्यात आली. मात्र सदर बांधकाम अपूर्णावस्थेत ठेवण्यात आले. बांधकाम पूर्ण करावे, यासाठी शाळेचे शिक्षक व गावकऱ्यांनी अनेकवेळा जिल्हा परिषद व शिक्षण विभागाकडे पाठपुरावा केला. मात्र बांधकामासाठी निधी उपलब्ध झाला नाही. परिणामी सदर वर्गखोली दहा वर्षांपासून अर्धवट स्थितीतच आहे. शाळेत आता एकच वर्गखोली असल्याने चारही वर्ग एकाच वर्गखोलीत भरविले जात आहेत.चार वर्गातील विद्यार्थ्यांना पुरेशी जागा होत नाही. चारही वर्गातील विद्यार्थ्यांच्या आवाजामुळे गोंधळ निर्माण होतो. याचा परिणाम अध्ययनावर पडत आहे. या गंभीर बाबीकडे शिक्षण विभाग व जिल्हा परिषदेने लक्ष द्यावे, अन्यथा शाळेला कुलूप ठोकण्याचा इशारा विद्यार्थ्यांच्या पालकांनी व ग्रामस्थांनी दिला आहे.
एकाच खोलीत भरतात चार वर्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2018 12:40 AM
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मेडपल्ली येथे मागील दहा वर्षांपासून वर्गखोलीचे बांधकाम अपूर्ण आहे. त्यामुळे एकाच वर्गखोलीत चार वर्गाच्या विद्यार्थ्यांना बसवून अध्ययन करावे लागत आहे.
ठळक मुद्देदहा वर्षांपासून वर्गखोली अर्धवट : मेडपल्लीच्या विद्यार्थ्यांचे नुकसान