लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : कोरोना संसर्गाच्या काळात किराणा मालाची दुकाने अत्यावश्यक सुविधांमध्ये येत असल्याने आवश्यक काळजी घेण्याच्या सूचना करून ठराविक कालावधीसाठी ती खुली ठेवण्यास मंजुरी देण्यात आली आहे. पण या सुविधेचा गैरफायदा घेत जिल्ह्यात अनेक जण किराणा दुकानाआड खर्रा व तंबाखूजन्य पदार्थ विकत असल्याचे समोर येत आहे. अशा अनेक विक्रेत्यांच्या दुकानांवर मुक्तिपथ तालुका कार्यकर्त्यांनी छापे मारून साहित्य नष्ट केले.कोरोना संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी जिल्ह्यात सर्वत्र लॉकडाऊन पाळले जात आहे. अत्यावश्यक सेवा, सुविधा वगळता व्यापारी प्रतिष्ठाने पूर्णत: बंद आहे. पानठेल्यांमुळे लोक विनाकारण एकत्र येतात. तसेच खर्रा व तंबाखूजन्य पदार्थ खाणारे सतत थुंकत असतात. हा प्रकार टाळण्यासाठी राज्यासह जिल्ह्यात खर्रा, सुगंधित तंबाखू, गुटखा, पानमसाला व सुगंधित सुपारी यांचे उत्पादन, साठवणूक, वितरण आणि विक्रीवर एका वर्षाकरिता शासनाने प्रतिबंध घातला आहे. परिणामी सर्वत्र पानठेले बंद आहे. पण याचा फायदा घेत अनेक ठिकाणी किराणा दुकानदार लपून छपून खर्रा व तंबाखूजन्य पदार्थाची विक्री करीत आहे. अनेक पानठेलाधारकही गावांमध्ये घरून खर्राविक्री करीत आहेत. काही विक्रेते तर घरी मोठ्या प्रमाणात खर्रा बनवून किराणा दुकानात त्याची गुपचूप विक्री करीत आहे. यामुळे नियमांचा भंग तर होत आहेत पण धोकही वाढला आहे. ही बाब लक्षात येताच एटापल्ली, कुरखेडा, धानोरा, सिरोंचा, भामरागड तालुक्यातील मुक्तिपथ तालुका चमूने कोरोंना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करीत किराणा दुकानांमध्ये छापे मारून मुद्देमाल नष्ट केला. शासकीय नियमांचे पालन करण्याचे आवाहनही त्यांनी केले.धानोरा तालुक्यातील मिचगाव(बु.) येथे एक इसम आपल्या किराणा दुकानातून खर्रा व प्रतिबंधित सुगंधित तंबाखू विकत असल्याची माहिती मुक्तिपथ चमुला मिळाली. त्यांनी गावच्या सरपंच ज्योत्स्ना कोवे व पोलीस पाटील पुनाजी राऊत यांच्या मदतीने या दुकानाची तपासणी केली असता तब्बल तीन हजाराचा मझा हा सुगंधित तंबाखू सापडला. सोबतच खर्रा पन्नी व इतरही साहित्य सापडले. हा सर्व माल नष्ट करण्यात आला. यावेळी नागरिक हजर होते. या कारवाईमुळे खर्राविक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.एटापल्ली तालुक्यात चार गावात छापेतालुक्यातील काही गावांमध्ये किराणा दुकानात खर्रा विक्री होत असल्याची माहिती मिळतात मुक्तिपथ तालुका चमूने गावांना गाठून कारवाई केली. यावेळी नेंडेर, पंदेवाही, तुमरगुंडा आणि गट्टा येथील एकूण ६ किराणा दुकानातून खर्रा, तंबाखूजन्य पदार्थ आणि खर्रा बनविण्यासाठी वापरात येणारे साहित्य तालुका चमूने नष्ट केले. सोबतच एटापल्ली येथील मुक्तिपथ तालुका संघटक किशोर मलेवार यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन पाटील यांची भेट एटापल्ली शहरातील ठोक विक्रेत्यांची तपासणी करून कारवाई करण्यासंदर्भात चर्चा केली.तालुक्याच्या ग्रामीण व शहरी भागात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खर्राविक्री व सेवन बंद ठेवण्याबाबत मुक्तिपथच्या वतीने जनजागृती करण्यात येत आहे. तरीसुद्धा लपून-छपून काहीजण खर्राविक्री करीत आहेत.कुरखेडा व सिरोंचा तालुक्यात दुकानांमध्ये कारवाईतालुक्यातील आंजनटोला आणि नान्ही येथे प्रत्येकी दोन तर चीचटोला येथील एक किराणा दुकानदार खर्राविक्री करीत होता. मुक्तिपथ तालुका कार्यकर्त्यांनी याची माहिती घेत दुकानांमध्ये छापे मारून खर्रा बनविण्यासाठी वापरात येणारे साहिती जप्त करून त्याची होळी केली.गावांतून मिळालेल्या माहितीच्या आधारे सिरोंचा तालुका चमूने जानमपल्ली, नदीगुंठा, अमरावती आणि सूर्यरावपल्ली येथील किराणा दुकानात छापे मारून खर्रा बनविण्यासाठी वापरत येणारे साहित्य जप्त केले. सिरोंचा शहरात अनेक महिन्यांपासून पानठेल्यांमध्ये खर्राविक्री बंद असली तरी लपून छपून काही जण इतरत्र विक्री करतात. काही दुकानांची पाहणी केली असता एका डेली निड्स च्या दुकानात खर्रा घोटायची मशीन सापडली. तालुका चमूने ती ताब्यात घेतली.
सुगंधित तंबाखू व खर्याचे साहित्य जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2020 5:00 AM
अत्यावश्यक सुविधांमध्ये येत असल्याने आवश्यक काळजी घेण्याच्या सूचना करून ठराविक कालावधीसाठी ती खुली ठेवण्यास मंजुरी देण्यात आली आहे. पण या सुविधेचा गैरफायदा घेत जिल्ह्यात अनेक जण किराणा दुकानाआड खर्रा व तंबाखूजन्य पदार्थ विकत असल्याचे समोर येत आहे. अशा अनेक विक्रेत्यांच्या दुकानांवर मुक्तिपथ तालुका कार्यकर्त्यांनी छापे मारून साहित्य नष्ट केले. कोरोना संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी जिल्ह्यात सर्वत्र लॉकडाऊन पाळले जात आहे.
ठळक मुद्देकिराणा दुकानातून सुरू आहे खर्राविक्री : संचारबंदीच्या आदेशाचे ग्रामिण भागात उल्लंघन