जिल्हा महिला व बाल रुग्णालयात लस घेणाऱ्या सदर व्यक्तींना आठवड्यातील साेमवारी व बुधवारी ही सेवा उपलब्ध झाली आहे.
माेफत ऑटाेसेवा उपक्रमाचे उद्घाटन नगराध्यक्ष याेगीता पिपरे यांच्या हस्ते झाले. यावेळी तालुका आराेग्य अधिकारी डाॅ. सुनील मडावी, पीएसआय सुनील मेश्राम, डाॅ. सचिन पेंदाम, बी. एल. ताकसांडे, जिल्हा साथराेग अधिकारी डाॅ. बन्साेड, एम. आर. जवंजाळकर, राेशन नैताम, कुंदा गेडाम, पूनम डाेंगरे, गीता हिंगे, दिलशाद पिराणी, पांडुरंग घाेटेकर, डी. एन. बर्लावार, एस. के. बावणे, सतीश पवार, मुकुंद उंदीरवाडे, संस्थेचे सचिव अकील शेख, प्रकाश माेहितकर, शंकरराव मगरे, जिब्राईल शेख, मयूर गड्डमवार उपस्थित हाेते.
माेफत ऑटाेसेवेचा लाभ घेणाऱ्या नागरिकांनी आधारकार्ड तसेच दिव्यांग व्यक्तींनी आधारकार्डसह अपंगाचे प्रमाणपत्र साेबत ठेवावे, असे आवाहन अकील शेख यांनी केले आहे.