रोजगाराभिमुख शिक्षण : १९१ बटालीयनचा देसाईगंजात पुढाकारलोकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज : केंद्रीय राखीव पोलीस दल १९१ पोलीस बटालीयनतर्फे देसाईगंजात बेरोजगारांना व्यवसायाच्या संधी मिळून सुखी जीवन जगता यावे, यासाठी संगीताचे नि:शुल्क धडे दिले जात आहेत. त्यामुळे बेरोजगारांना रोजगाराभिमुख शिक्षण मिळण्यास मदत मिळाली आहे. देसाईगंज येथील ख्रिश्चन मिशनरीतर्फे चालविल्या जाणाऱ्या ब्रिलिक्स चर्चमध्ये कमांडंट प्रभाकर त्रिपाठी यांच्या मार्गदर्शनाखाली व फादर सतीश आत्राम यांच्या उपस्थितीत संगीताचे वर्ग सुरू असून ओक्टापॅड अवचित मेश्राम, कॅशिओ मारोती दाभाडे, क्यांगो शंकर कारे, तबला सतीश कुमरे, ढोलक कांबळे, गिटारचे धडे अजय राऊत व गीतगायन अवचित मेश्राम करीत आहेत. आदी प्रशिक्षकांमार्फत संगीत वर्गातील ५० विद्यार्थ्यांना संगीताचे धडे दिले जात आहेत. सोबतच बाहेर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचाही यात समावेश आहे. युवकांना रोजगाराभिमुख शिक्षण मिळून भावी काळात त्यांनी स्वत:बरोबर इतरांनाही शिक्षण देऊन समाजकार्याला वाहून घ्यावे. प्राचीन काळापासून आजपर्यंत संगीत या शिक्षण प्रकाराने अनेकांचा उदरभरणाचा प्रश्न कायम सोडविला असून राजदरबारातील बारा बलुतेदारांपैैकी एक याप्रकारचे सन्मानाचे जीवन जगले आहे. साहित्य, संगीत व कला मानसाला प्रतिष्ठा प्राप्त करून देते असल्याने युवकांनीही शासकीय योजनांचा लाभ घेऊन आपली प्रगती साधावी, असे आवाहन सीआरपीएफचे कमांडंट प्रभाकर त्रिपाठी यांनी केले तर संगीताशिवाय मानवी जीवनात आनंद नाही, असे प्रतिपादन पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील यांनी केले. यावेळी उपकमांडंट संजय शर्मा, अजित उपाध्याय, डॉ. नीतेश परचाके, संतोष दरंगे, प्रा. दयाराम फटिंग, विष्णू वैरागडे, फादर सतीश आत्राम उपस्थित होते.
सीआरपीएफतर्फे संगीताचे नि:शुल्क धडे
By admin | Published: May 23, 2017 12:47 AM