लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : सर्व शिक्षा अभियान अंतर्गत पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके उपलब्ध करून दिली जातात. यावर्षी जिल्हाभरातील १ लाख १५ हजार ६५३ विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे.पहिली ते आठवीपर्यंतचे प्राथमिक शिक्षण मोफत देणे ही शासनाची जबाबदारी आहे. त्यामुळे किमान प्राथमिक शिक्षण विद्यार्थ्याने घ्यावे, यासाठी शासनाच्या मार्फत विविध योजना राबविल्या जातात. यातील बहुतांश योजनांची अंमलबजावणी सर्व शिक्षा अभियानच्या माध्यमातून केली जाते. या अंतर्गतच विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके उपलब्ध करून दिली जातात. विद्यार्थ्यांची नेमकी संख्या कळावी यासाठी आॅनलाईन पध्दतीने पुस्तकांची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार पहिली ते आठवीपर्यंत एकूण १ लाख १५ हजार ६५३ विद्यार्थी आहेत. पहिलीचे १४ हजार ३५२, दुसरीचे १४ हजार ३५४, तिसरीचे १४ हजार ४३३, चवथीचे १३ हजार ८४२, पाचवीचे १४ हजार ३४५, सहावीचे १५ हजार १९४, सातवीचे १४ हजार ५२०, आठवीचे १४ हजार ६१३ विद्यार्थी आहेत.पहिली व आठवीचा अभ्यासक्रम बदललापहिली व आठवीचा अभ्यासक्रम यावर्षी बदलला आहे. तरीही याही पुस्तकांचा तुटवडा निर्माण होणार नाही, या दृष्टीने शिक्षण विभागाने खबदारी घेतली असून पुस्तकांची छपाई सुरू केली आहे.लवकरच पाठ्यपुस्तकांचा पुरवठाशाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्याला पाठ्यपुस्तके उपलब्ध व्हावे, या दृष्टीने शिक्षण विभागाने नियोजन केले आहे. दोन ते तीन दिवसात पंचायत समिती स्तरावर पाठ्यपुस्तके उपलब्ध होणार आहेत. त्यानंतर सदर पाठ्यपुस्तके शाळेत नेली जातील. पुस्तकांसाठी पालक व विद्यार्थ्यांची ओरड होऊ नये, म्हणून शाळा सुरू होण्याच्या किमान १५ दिवसाअगोदरच संबंधित शाळेपर्यंत पुस्तके पोहोचणार आहेत.
सव्वा लाख विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 11:03 PM
सर्व शिक्षा अभियान अंतर्गत पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके उपलब्ध करून दिली जातात. यावर्षी जिल्हाभरातील १ लाख १५ हजार ६५३ विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे.
ठळक मुद्देसर्वशिक्षा अभियान : पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना लाभ