मुरूमगाव येथे ३० वर्षांपासून स्वतंत्र विद्युत उपकेंद्र आहे. बऱ्याच वर्षांपासून सुरळीत सेवा मिळत हाेती. परंतु काही महिन्यांपासून वीज पुरवठा वारंवार खंडित हाेत आहे. विशेष म्हणजे, हा परिसर जंगलव्याप्त आहे. त्यामुळे वादळवारा सुटल्यानंतर वीज पुरवठा खंडित हाेताे. येथील कनिष्ठ अभियंता मुख्यालयी राहत नाही. काेटगुल परिसरातील ४८ गावे मुरूमगाव उपकेंद्रांतर्गत येतात. याच उपकेंद्रातून ३३ केव्ही व ११ केव्हीची लाईन गेलेली आहे. दाेन्ही लाईन क्लियर करून ठेवणे आवश्यक आहे. परंतु वेळीच उपाययाेजना हाेत नसल्याने वीज पुरवठा खंडित हाेताे. मुरूमगाव येथे शाळा, शासकीय कार्यालये तसेच व्यापारी प्रतिष्ठाने आहेत. वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर तेथील काम ठप्प पडते. याशिवाय येथील बीएसएनएलचा कव्हरेज वारंवार विस्कळीत हाेत असल्याने नागरिक त्रस्त आहेत.
वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून सुरळीत वीज पुरवठा करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.