शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रकांत पाटलांविरोधात भाजपचे बालवडकर दंड थोपटणार? बाहेरचा उमेदवार पुन्हा लादला, कोथरुडमध्ये बंडखोरीचे वारे
2
मविआत नाट्यमय घडामोडी सुरु असताना, शिंदे गट शिवसेना थोड्याच वेळात पहिली यादी जाहीर करणार
3
धक्कादायक! करवाचौथला सासरी जाणाऱ्या महिला पोलिसावर गावाबाहेर अत्याचार; विरोध करताना दात तुटला
4
मविआचा जागावाटपाचा गुंता सुटेना; राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांना दिल्लीत थांबण्याचे आदेश
5
३ हजार वर्षांची प्राचीनता, कालातीत अखंड परंपरा; दिवाळी नेमकी का साजरी करतात? पाहा, महात्म्य
6
SIP Pause Vs Close: एसआयपी पॉज करावी की बंद, अचानक पैशांची तंगी आल्यास काय कराल; कोणता पर्याय निवडावा?
7
बाॅम्बच्या धमक्यांमुळे विमान प्रवासाची बोंबाबोब; DGCA प्रमुख विक्रम देव दत्त यांची उचलबांगडी
8
नारायण राणेंचे निकटवर्तीय नवव्यांदा रिंगणात, कालिदास कोळंबकरांना भाजपकडून उमेदवारी
9
दिवाळीत कन्फर्म तिकीट मिळणार? प्रवाशांसाठी ५७० विशेष सेवा; गर्दी टाळण्यासाठी उपाय
10
मोठ्या तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाची सुरूवात; Sensex मध्ये ५४५, तर Nifty मध्ये १०२ अंकांची तेजी
11
आजचे राशीभविष्य : नोकरीत वरिष्ठांचे सहकार्य लाभेल, सामाजिक मान-सन्मान मिळाल्याने प्रसन्न वाटेल
12
घट्ट मिठी अन् प्रेमाचा वर्षाव! सूरज चव्हाणला केदार शिंदेंनी दिली खास भेटवस्तू, व्हिडीओ व्हायरल
13
ज्येष्ठ नागरिकांना लोनची गरज पडली तर करावं? 'हे' ४ पर्याय बनू शकतात 'संकटमोचक', जाणून घ्या
14
गौरी योग: ७ राशींना दिवाळीपूर्वी मोठे लाभ, गुंतवणुकीत नफा; अपार यश, शुभ-सौभाग्याचा काळ!
15
Mutual Fund Investment : ३००० रुपयांच्या SIP नं बनले ५ कोटी रुपये; 'या' म्युच्युअल फंडानं गुंतवणूकदारांवर पाडला पैशांचा पाऊस
16
पहिल्या घटस्फोटावर नीलम कोठारीने पहिल्यांदाच केलं भाष्य; म्हणाली, "त्याने मला माझी ओळख..."
17
T20 World Cup: न्यूझीलंडच्या महिला जगज्जेत्या! दक्षिण आफ्रिकेवर ३२ धावांनी विजय
18
ही शाळा की कोचिंग क्लास? शिक्षणाचा मूळ उद्देश काय आहे, याचे भान व्यवस्थांना कधी येईल?
19
'आई आणि बाबा रिटायर होत आहेत' मालिकेची तारीख अन् वेळ ठरली! ही मालिका घेणार निरोप?
20
मुंबई विद्यापीठाने नियोजित परीक्षा पुढे ढकलल्या; विद्यार्थी मतदारांसाठी घेतला निर्णय

वेळेवर निधी मिळत नाही; लोकांचे बोलणे आम्ही का ऐकावे?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2024 3:14 PM

सरपंच संघटनेचे निवेदन : जिल्हा परिषद सीईओंची घेतली भेट; उपजिल्हाधिकाऱ्यांशीही केली चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली: ग्रामपंचायत अंतर्गत येणारी सर्वसामान्यांची कामे निधीअभावी करता येत नाहीत. त्यामुळे लोकांच्या रोषाचा सरपंचांना सामना करावा लागतो. त्यांचे बोलणे ऐकावे लागते. या सर्व बाबींचा विचार करून जिल्ह्यातील सरपंच संघटनेने जिल्हाधिकारी संजय दैने व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांची भेट घेऊन त्यांना १२ मागण्यांचे निवेदन ३० सप्टेंबर रोजी दिले.

घरकुल योजनेतील यशवंतराव चव्हाण आवास योजनेंतर्गत नव्याने प्रस्ताव मागवून वाढीव घरे देणे, मोदी आवास योजनेंतर्गत ज्यांची घरे बांधून झाली किंवा प्रस्तावित आहेत त्यांना यथाशिघ्र निधीचे वितरण करणे, प्रधानमंत्री आवास योजनेमधील निधी उपलब्ध करून देणे, जि.प.च्या शाळांमध्ये कंत्राटी शिक्षकांची नियुक्ती न करता नियमित शिक्षकांच्या नियुक्त्या कराव्यात, पेसा/नॉन पेसा क्षेत्रातील रिक्त पदे भरावीत, शिक्षकांना फक्त शिकवू द्यावे, अशैक्षणिक कामे त्यांना देऊ नयेत, मोफत शालेय गणवेशाचा निर्माण झालेला घोळ यथाशिघ्र मार्गी लावावा, अशा एकूण १२ मागण्यांचे निवेदन देण्यात आले. 

यावर तोडगा काढण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले. दरम्यान, सरपंच संघटनेच्या अध्यक्ष अपर्णा राऊत, उपाध्यक्ष संदीप वरखडे, सचिव पुरुषोत्तम बावणे, संघटनेचे सदस्य चक्रधर नाकाडे, यशवंत काळबांधे, तुषार मडावी, सुनील सयाम, अनिल दळांजे, चेतन सुरपाम, प्रवीण उसेंडी, अमोल पुघांटी, भारती जुगनाके, गोपाल उईके, वनश्री भागडकर, रूपलता बोदेले, उषा शेडमाके, पूनम किरंगे, मोनिका पुळो, प्रदीप मडावी, दादाजी वालदे व सरपंच उपस्थित होते. 

'जलजीवन'ची कामे ग्रा.पं. कडे हस्तांतरित करावीत जलजीवन मिशन योजना खासगी कंत्राटदारांमार्फत वरिष्ठ कार्यालयीन पातळीवर सुरू असल्याने ते सरपंच किंवा ग्रामपंचायतीला विश्वासात घेत नाही. त्यामुळे कामाचा दर्जा निकृष्ट आहे. त्याची चौकशी करावी व उर्वरित कामे ग्रामपंचायतीकडे हस्तांतरित करावीत. ग्रा.पं. अंतर्गत रस्त्यांच्या कामांकरिता निधी उपलब्ध करून द्यावा, ठक्करबापा, दलित वस्ती सुधार योजना, नागरी जनसुविधा योजनेतील निधी आचारसंहिता सुरू होण्यापूर्वी ग्रा.पं. कार्यालयास हस्तांतरित करावा, अशी मागणी केली.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतGadchiroliगडचिरोली