आॅनलाईन लोकमतवर्षा पडघनगडचिरोली : गडचिरोलीचे नाव काढले की राज्याच्या टोकावरील एक मागास, आदिवासीबहुल आणि नक्षलग्रस्त जिल्हा अशी ओळख समोर येते. पण या जिल्ह्यात रासायनिक औषधांपासून मुक्त असलेल्या रानभाज्या सध्या अनेकांसाठी आकर्षण ठरत आहेत. शरीरासाठी आवश्यक असणाºया विविध घटकांनी युक्त असलेल्या या भाज्या सध्या गडचिरोली जिल्ह्यातील गावागावात उपलब्ध झाल्या आहेत.पावसाळ्याच्या मर्यादित कालावधीत विक्रीसाठी येणाºया या भाज्यांमध्ये प्रामुख्याने खापरखुटी, अरतफरी, कुड्याचे फूल, शेरडिरे, तरोटा, कडूभाजी, हेटीचे फूल, धानभाजी, वास्ते (बांबूचा कोंब), टट्टूच्या शेंगा, कोचई, काटवल, मुंगन्याच्या शेंगा या भाज्या प्रामुख्याने सर्वत्र दिसत आहेत. प्रोटिन, कॅल्शियम, आयर्न (लोह) अशा विविध घटकांचे प्रमाण या भाज्यांमध्ये मुबलक प्रमाणात असते. शरीरात हे घटक कमी झाले की मेडिकल स्टोअरमधून त्याच्या गोळ्या किंवा सिरप घेण्याचा सल्ला डॉक्टर देतात. पण गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांना रानभाज्यांमधूनच हे सर्व घटक मिळतात. मधुमेह, रक्तदाब यासारख्या आजारांवर नियंत्रण ठेवण्याचे कामही या भाज्यांमधून काही प्रमाणात होते. त्यामुळेच गडचिरोली जिल्ह्यात नक्षलविरोधी अभियानासाठी कार्यरत असलेल्या सीआरपीएफ, एसआरपीएफ आणि जिल्हा पोलीस दलासह विविध विभागांमध्ये कार्यरत अधिकारी-कर्मचारी या भाज्यांची खरेदी करताना दिसतात.नागरिकांना या भाज्यांची ओळख व्हावी आणि त्यांचे महत्व पटावे यासाठी कृषी विज्ञान केंद्र सोनापूर (गडचिरोली) यांच्याकडून दरवर्षी जुलै महिन्यात रानभाजी महोत्सवही आयोजित केला जातो. त्यात या भाज्यांचे आरोग्यविषयक महत्व सांगितले जाते. नुकताच हा महोत्सव झाला.पौष्टिक मशरूम (वरंबी)संततधार पावसानंतर जंगलातील विविध जागांवर उगवणारे मशरूम हेसुद्धा एक आकर्षण आहे. त्याची भाजी अतिशय पौष्टिक आणि चवदार होते. त्यामुळेच २०० ते २५० रुपये किलो असा दर मशरूमला मिळतो. पण ते अतिशय मर्यादित दिवसच उपलब्ध असतात.
गडचिरोलीतील रानभाज्या देतात नैसर्गिक प्रोटिन, कॅल्शियम, आयर्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2017 3:20 PM
आॅनलाईन लोकमतवर्षा पडघनगडचिरोली : गडचिरोलीचे नाव काढले की राज्याच्या टोकावरील एक मागास, आदिवासीबहुल आणि नक्षलग्रस्त जिल्हा अशी ओळख समोर येते. पण या जिल्ह्यात रासायनिक औषधांपासून मुक्त असलेल्या रानभाज्या सध्या अनेकांसाठी आकर्षण ठरत आहेत. शरीरासाठी आवश्यक असणाºया विविध घटकांनी युक्त असलेल्या या भाज्या सध्या गडचिरोली जिल्ह्यातील गावागावात उपलब्ध झाल्या आहेत.पावसाळ्याच्या मर्यादित ...
ठळक मुद्दे रानभाजी महोत्सवाचे आयोजनमशरूमही लोकप्रिय