पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) सोमय मुंडे, अहेरीचे अपर पोलीस अधीक्षक अनुज तारे, यू-मुंबाचे टीम लीडर संदीप सिंग, यू-मुंबा संघाचे उत्कृष्ट खेळाडू अजय कापरे, पोलीस उपअधीक्षक (अभियान) भाऊसाहेब ढाेले, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणील गिल्डा या मान्यवरांच्या हस्ते विजेत्या संघांना शहीद वीर पांडू आलाम सभागृहात बक्षीस वितरण करण्यात आले.
प्रथम क्रमांकाच्या विजेत्या संघाला २५ हजार रुपये, ट्राॅफी, संघातील सर्व खेळाडूंना प्रशस्तीपत्र, गोल्ड मेडल व यू-मुंबा टी-शर्ट, दुसऱ्या क्रमांकाच्या विजेत्या संघाला २० हजार रुपये रोख, ट्राॅफी व संघातील सर्व खेळाडूंना प्रशस्तीपत्र, सिल्व्हर मेडल, यू-मुंबा टी-शर्ट, तिसऱ्या क्रमांकाच्या विजेत्या संपाला १५ रुपये रोख, ट्राॅफी, संघातील सर्व खेळाडूंना प्रशस्तीपत्र, ब्राँझ मेडल, तसेच उपविभाग भामरागडच्या लिटिल बाॅइज कबड्डी संघास उत्तेजनार्थ ५ हजार रुपयांचे बक्षीस व सर्व खेळाडूंना प्रशस्तूपत्र देऊन गौरविण्यात आले. उत्कृष्ट रायडर आशिष विश्वास गडचिरोली, उत्कृष्ट ऑलराउंडर सुधीर मिस्त्री गडचिरोली, उत्कृष्ट डिफेंडर हर्षद नरोटे धानोरा या खेळाडूंना ट्राॅफी व ट्रॅकसूट देऊन गाैरविण्यात आले. यू-मुंबा टीम लीडर संदीप सिंग व युवा संघाचे उत्कृष्ट खेळाडू अजिंक्य कापरे यांचा शाल, श्रीफळ, मोमेंटो, प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
स्पर्धेच्या आयाेजनासाठी नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी सहायक पाेलीस निरीक्षक महादेव शेलार व अंमलदार यांनी सहकार्य केले.
बाॅक्स
या दहा संघांनी नाेंदविला सहभाग
कबड्डी स्पर्धेला २४ सप्टेंबरपासून सुरुवात झाली. अंतिम सामने २५ रोजी पार पडले. स्पर्धेमध्ये महाराणा प्रताप क्लब गडचिरोली, देसाईगंज संघ कुरखेडा, कबड्डी संघ वाघभूमी धानोरा, जय बजरंगबली क्लब कारवाफा पेंढरी, कोरेली कबड्डी संघ पेरमिली अहेरी, बाजीराव फिटनेस क्लब संघ कृष्णार एटापल्ली, जय ठाकूरदेव क्रीडा मंडळ परसलगोंदी हेडरी, लिटिल बाॅइज कबड्डी संघ पिटेकसा भामरागड, जय गोंडवाना कबड्डी संघ जिमलगट्टा, उडान बॉइज क्लब कबड्डी संघ सिरोंचा या १० संघांनी सहभाग घेतला हाेता. एकूण १२० खेळाडूंनी खेळाचे काैशल्य दाखविले.