दिलीप दहेलकर, गडचिराेली
Gadchiroli - Chimur Lok Sabha Results 2024 : गडचिरोली- चिमूर लोकसभा मतदारसंघात सहाव्या फेरीअखेर इंडीया आघाडीचे अर्थात काँग्रेसच्या डॉ. नामदेव किरसान यांनी आघाडी घेतली आहे. किरसान हे सरासरी १८ हजार ५२४ मतांनी आघाडीवर आहेत.
या मतदासंघात भाजपचे विद्यमान खासदार अशोक नेते विरुद्ध काँग्रेसचे डॉ. नामदेव किरसान अशी थेट लढत आहे. मुल मार्गावरील कृषी महाविद्यालयाचया इमारतीमध्ये मंगळवारी सकाळी ८ वाजतापासून मतमोजणीला सुरुवात झाली. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात १४ टेबल याप्रमाणे एकूण ८४ टेबलवर मतमोजणी सुरू आहे. मतमोजणीच्या पहिल्या फेरीचे आकडे साडेदहा वाजता बाहेर आले. यात डॉ. नामदेव किरसान यांना अशोक नेते यांच्यापेक्षा तीन हजारांचे मताधिक्क्य हाेते. एकूण २६ फेऱ्या होणार आहेत.
दरम्यान, गडचिरोली - चिमूर मतदासंघांत १६ लाख १७ हजार २०७ इतके मतदार आहेत. यापैकी ११ लाख ६२ हजार ४७६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत मतमोजणी प्रक्रिया सुरू आहे. मतमोजणी प्रक्रिया अतिशय धीम्या गतीने सुरू आल्यामुळे निकाल घोषित करण्यास विलंब होत आहे.
सहावी फेरीगडचिरोली - चिमूर लोकसभा मतदार संघ..काँग्रेस : डॉ. नामदेव किरसान - १़३७९७४भाजप- खा. अशोक नेते - १़१९४५०काँग्रेसचे डॉ.नामदेव किरसान १८५२४ मतांनी आघाडीवर..