संजय तिपाले/ गडचिरोली
गडचिरोली : गडचिरोली - चिमूर लोकसभा मतदारसंघात पहिल्या फेरीअखेर काँग्रेसच्या डॉ. नामदेव किरसान यांनी आघाडी घेतली आहे. किरसान हे सरासरी तीन हजार इतक्या मतांनी पुढे आहेत.
या मतदासंघात भाजपचे विद्यमान खासदार अशोक नेते विरुद्ध काँग्रेसचे डॉ. नामदेव किरसान अशी लढत आहे. शहरातील कृषी महाविद्यालय इमारतीत मंगळवारी सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात १४ टेबल याप्रमाणे एकूण ८४ टेबलवर मतमोजणी सुरू आहे. मतमोजणीच्या पहिल्या फेरीचे आकडे साडेदहा वाजता बाहेर आले . यात डॉ. नामदेव किरसान यांना अशोक नेते यांच्यापेक्षा तीन हजारांचे मताधिक्क्य आहे. एकूण २६ फेऱ्या होणार आहेत. तथापि, होमपिच असलेल्या आमगावातच डॉ. किरसान हे पिछाडीवर असून इतर पाचही विधानसभा क्षेत्रांत ते आघाडीवर आहेत.
दरम्यान, गडचिरोली - चिमूर मतदासंघांत १६ लाख १७ हजार २०७ इतके मतदार आहेत. यापैकी ११ लाख ६२ हजार ४७६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत मतमोजणी प्रक्रिया सुरू आहे.
मतमोजणी धीम्या गतीनेमतमोजणी प्रक्रिया अतिशय धीम्या गतीने सुरू आहे. त्यामुळे निकाल घोषित करण्यास विलंब होत आहे. आरमोरी विधानसभा क्षेत्रातील १७ क्रमांकांच्या ईव्हीएममध्ये बिघाड निर्माण झाला आहे. त्यामुळे मतमोजणी प्रक्रियेत व्यत्यय आला होता.