शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मविआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

स्वच्छतेत गडचिरोली शहरात सारेच फेल

By admin | Published: November 10, 2014 10:42 PM

देशभर स्वच्छता अभियान राबविले जात आहे. या अभियानात सरकारी कार्यालयेही सहभागी आहेत. गडचिरोली शहरातील सरकारी कार्यालयांची स्वच्छता नेमकी कुठपर्यंत आली आहे.

दिगांबर जवादे - गडचिरोलीदेशभर स्वच्छता अभियान राबविले जात आहे. या अभियानात सरकारी कार्यालयेही सहभागी आहेत. गडचिरोली शहरातील सरकारी कार्यालयांची स्वच्छता नेमकी कुठपर्यंत आली आहे. हे पाहण्यासाठी आज लोकमतने शहरातील तहसील कार्यालय, उपविभागीय कार्यालय व पंचायत समिती या तीन शासकीय आस्थापनांना भेटी देऊन येथील स्वच्छतागृहांची परिस्थिती जाणली. अतिशय विदारक परिस्थिती या तिनही ठिकाणी असल्याचे लोकमतच्या या स्टिंग आॅपरेशनमध्ये दिसून आले आहे. या कार्यालयातील कर्मचारीही या अस्वच्छतेमुळे त्रस्त आहेत. परंतु स्वत: स्वच्छता करण्याची त्यांची तयारी नसल्याचे स्पष्टपणे दिसून आले.स्वच्छता कर्मचाऱ्यानेच सर्व स्वछता करावी. त्याच्यावरच सारे अवलंबून आहेत, असे एकूण चित्र दिसून आले.शौचालय व स्वच्छतागृहात केवळ घाणचलोकमतच्या प्रतिनिधीने सकाळी १०.१५ वाजता गडचिरोली येथील तहसील कार्यालयाला भेट दिली. यावेळी प्रतिनिधी सरळ तहसील कार्यालयाच्या स्वच्छतागृहात गेले. येथे काय परिस्थिती आहे, हे जाणल्यावर विदारक चित्र समोर आले. पुरूषांच्या स्वच्छतागृहात तीन शौचालय, दोन बेसीन व चार मुताऱ्या असल्याचे दिसून आले. या ठिकाणी पाण्याचे पाईप असले तरी पाणीपुरवठा मात्र बंद होता. शौचालयाच्या समोरच एक मोठे टाके व रांजन भरले होते. त्यामध्ये पाणी भरून दिसले. शौचालयांची अवस्था मात्र अत्यंत बकाल दिसली. नाकाला रूमाल लावूनच शौचालयात प्रवेश करावा लागतो, अशी घाण या ठिकाणी पसरलेली आढळली. मुताऱ्यांमध्ये खर्राच्या पन्न्या ठेवण्यात आल्या आहे, असे दिसून आले. जागोजागी टाईल्स लावलेल्या भिंतीवर खर्राच्या पिचकाऱ्या उडलेल्या दिसल्या. याचा वापर करणारे कर्मचारी टाक्यातील पाणी घेऊन तेथे टाकत नसावे, असे स्पष्टपणे दिसून आले. बाजुलाच महिलांचे शौचालय आहे. शौचालयाकडे जाणारा मुख्य दरवाजाचे तावदान पूर्णपणे तुटले आहे. त्याचबरोबर शौचालयाचेही तावदान पूर्णपणे तुटले आहे. त्यामुळे दरवाजाचा अर्धाभाग पूर्णपणे मोकळा असल्याचे दिसून आले. अशा परिस्थितीतही महिला कर्मचाऱ्यांना याचा वापर नाईलाजास्ताव करावा लागतो, असेही दिसून आले. तहसीलदारांच्या कक्षाच्या मागेच त्यांचे स्वतंत्र स्वच्छतागृह आहे. या स्वच्छतागृहातील लाईट बंद असल्याने पूर्णपणे अंधार पसरला असल्याचे दिसले. शौचालयाची सीट मागील एक महिन्यापासून अस्वच्छ असावी, एवढे घाण तेथे जमा आहे, असे दिसून आले.महिलांचे स्वच्छतागृह कुलूपबंदवेळ सकाळी १०.३५ वाजताउपविभागीय कार्यालयाचे शौचालय कार्यालयाच्या अगदी मागे आहे. शौचालयाच्या चारही बाजुला मोठमोठे गवत उगविले आहे. पुरूषांच्या शौचालयात दगड, रेती पसरलेली दिसून आली. कर्मचारी सदर शौचालयाचा अजिबात वापर न करता शौचालयाच्या बाहेरच लघुशंकेसाठी जातात, असे दिसून आले आहे. येथे आजुबाजूला तशी अवस्था दिसून आली. महिलांसाठी दुसऱ्या बाजुला असलेले शौचालय कुलूप बंद स्थितीत आढळून आले. सदर शौचालयाचा दरवाजा उघडण्यासाठी प्रस्तुत प्रतिनिधीने कार्यालयाच्या प्रशासनाला विनंती केली असता, तेथे उपस्थित कर्मचाऱ्याने दरवाजा उघडून दाखविला. आतमध्ये उंदीराची विष्टा मोठ्या प्रमाणावर जमा असल्याचे दिसून आले. संपूर्ण शौचालय जाळे व झुरळांनी व्यापलेले दिसले. शौचालयाच्यावर पाण्याची टाकी दिसून आली. मात्र त्यात पाण्याची साठवणूक होत नाही, असे दिसून आले. शौचालयात नळांना तोट्या लावलेल्या नाही. त्यामुळे पाण्याची साठवणूक या ठिकाणी होतच नाही, असे दिसून आले. कुलूप बंद असलेल्या महिला शौचालयाबाबत येथील महिला कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता, लघुशंका व शौचासाठी कार्यालयीन वेळेत नाईलाजास्तव तहसील कार्यालय गाठावे लागते, असे त्यांनी सांगितले. शौचालयाची दुरूस्ती करण्याची मागणीही केली. येथील शौचालयाचा परिसर हा झुडुपी गवताने व्यापून गेला असल्याने याचा वापर येथील कर्मचारी अजिबाद करीत नसल्याचे प्रत्यक्ष दर्शनी दिसून आले.