शहरं
Join us  
Trending Stories
1
बाळासाहेब थोरातांच्या हाती राज्याचे अधिकार द्यायला हवे; शरद पवारांचं मोठं वक्तव्य
2
IND vs SA 3rd T20: टीम इंडियाने पुन्हा केली तीच 'आयडिया'! तिलकने खेळ थांबवला अन् आफ्रिकेचा 'गेम' झाला!!
3
इस्रायलचा बेरूतमध्ये मोठा हवाई हल्ला, अनेक इमारतींचे नुकसान, सात मुलांसह २३ जणांचा मृत्यू
4
'शक्तिमान'साठी मुकेश खन्नांनी रणवीर सिंहला केला होता विरोध; म्हणाले, "तो दोन तास..."
5
घसरणीच्या सत्रांनंतर अखेर शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स-निफ्टी वधारला; मिडकॅप-स्मॉलकॅप मध्ये खरेदी
6
अमित ठाकरे यांना मतदान का करावे? ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितले 'हे' 10 मुद्दे
7
मुंबईत मोदींच्या सभेसाठी वाहतूक मार्गात बदल; निवडणुकीसाठी काही रस्त्यांवर सहा दिवस नो पार्किंग!
8
भाजपाचे ज्येष्ठ नेते, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे निधन
9
...तर त्यांच्या कानाखाली फटाके वाजवा, भाषण करताना राज ठाकरे संतापले, कारण काय?
10
"सरकार पाडण्यासाठी आमदारांना ५० कोटींची ऑफर...", मुख्यमंत्र्यांचा भाजपवर आरोप
11
आजचे राशीभविष्य - १४ नोव्हेंबर २०२४, सगळ्या कामात यश मिळाल्याने खूप आनंदी आणि प्रसन्न व्हाल
12
भाजपकडून माझा बुथ, सर्वात मजबूत अभियान, नरेंद्र मोदी साधणार महाराष्ट्रातील १ लाख बुथ प्रमुखांशी संवाद
13
विशेष लेख: न्या. चंद्रचूड मानवी हक्क आयोगाचे नवे अध्यक्ष?
14
कोण आहेत कॅनडातील सर्वात श्रीमंत भारतीय, ज्यांना जगही म्हणतं कॅनडियन वॉरन बफे; पद्मश्रीनंही झालाय सन्मान
15
आजचा अग्रलेख: 'बुलडोझर'ला ब्रेक...
16
धक्कादायक! जळगावात गरोदर महिलेला घेऊन जाणाऱ्या ॲम्बुलन्समध्ये ऑक्सिजन सिलिंडरचा स्फोट; १५० फूट उंच उडाल्या चिंधड्या
17
शिवाजी पार्कवर आवाज कुणाचा?; १७ नोव्हेंबरला सभेसाठी मनसेला मंजुरी मिळण्याची शक्यता
18
मुंबईत प्लास्टिकच्या डब्यात तुकडे करून टाकलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले; प्रेमसंबंधाच्या विरोधातून हत्या!
19
नागपुरात कार्यकर्तेच बनले फडणवीसांच्या प्रचार मोहिमेचे सारथी
20
मार्कोची फास्टर फिफ्टी; पण शेवटी सूर्याची सेना जिंकली! आता फक्त टीम इंडियालाच मालिका विजयाची संधी

गडचिरोली जिल्ह्याच्या पेसातील निवृत्त शिक्षक भरतीचे 'वांधे'!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 01, 2024 3:49 PM

दुर्गम-अतिदुर्गम भागात द्यावी लागणार सेवा : जिल्ह्यात ५८८ जागा, अर्ज केवळ १४३

दिलीप दहेलकरलोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : जिल्ह्याच्या 'पेसा' क्षेत्रातील शिक्षक भरती शिक्षण सेवकाऐवजी कंत्राटी पद्धतीने महिनाभरात भरावीत, असे निर्देश राज्य शासनाने प्रशासनाला दिले आहेत. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्याच्या पेसा क्षेत्रातील शाळांमधील रिक्त ५८५ जागा भरण्याचा मार्ग मोकळा झाला. मात्र, केवळ १४३ अर्ज आले आहेत. 

जि. प. प्रशासनाने यासाठी सेवानिवृत्त शिक्षकांकडून अर्ज मागविले, मात्र रिक्त जागांच्या तुलनेत अत्यल्प अर्ज प्राप्त झाले आहे. त्यातच मानधनावर दुर्गम भागात सेवा द्यावी लागणार असल्याने बहुतांश सेवानिवृत्त शिक्षक यासाठी तयार नाहीत. याशिवाय वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्र आवश्यक असल्याने त्यांची मोठी अडचण झाली आहे. एकूणच जिल्ह्यात पेसा क्षेत्रातील शाळांमधील सेवानिवृत्त शिक्षक भरतीचे 'वांधे' झाले असून प्रशासकीय यंत्रणाही हतबल झाली आहे.

आदिवासी भागातील विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याच्या तक्रारी वाढल्याने राज्य शासनाने नुकताच एक आदेश जारी केला आहे. त्यानुसार 'पेसा' क्षेत्रातील नोकरभरती कंत्राटी पद्धतीने करण्याचे निर्देश दिले आहेत. 

या भरती प्रक्रियेत सेवानिवृत्त शिक्षक उपलब्ध न झाल्यास नव्याने निवड प्राप्त उमेदवाराला दरमहा २० हजार रुपयांचे मानधन देण्याची तरतूद करण्यात आली आहे. या नियुक्त्या तात्पुरत्या स्वरूपात असणार आहेत.

संघटनांचा भरतीला विरोध कायमशासनाच्या आदेशानुसार, निवृत्त शिक्षकांना पेसा क्षेत्रातील शाळांमधील शिक्षकांच्या रिक्त पदावर नियुक्त करण्याची सूचना ताबडतोब मागे घेऊन जिल्ह्यातील पात्र स्थानिक बेरोजगारांना संधी देण्यात यावी, तसे न झाल्यास ज्या शाळेत निवृत्त शिक्षक नियुक्त झाले अशा शाळांना कुलूप ठोकण्याचा इशारा बेरोजगार उमेदवारांच्या संघटनेसह विविध सामाजिक संघटनांनी दिला आहे.

जिल्ह्यात शिक्षकांची रिक्त पदे - ७००पेसा क्षेत्रात रिक्त पदे - ५८८एकूण अर्ज प्राप्त - १४३

या जिल्ह्यांत सुरू आहे सेवानिवृत्त शिक्षक भरती प्रक्रिया पंचायत विस्तार (अनुसूचित क्षेत्र) अधिनियम १९९६ (पैसा) हा कायदा २४ डिसेंबर १९९६ रोजी अस्तित्वात आला. या कायद्याअंतर्गत राज्यातील गडचिरोली, अहमदनगर, पुणे, ठाणे, पालघर, धुळे, नंदुरबार, नाशिक, जळगाव, अमरावती, यवतमाळ, नांदेड, चंद्रपूर व या जिल्ह्यांना पेसा हा कायदा लागू आहे. या जिल्ह्याच्या पेसा क्षेत्रात मोडणाऱ्या शाळांमधील रिक्त पदे सेवानिवृत्त शिक्षकांमधून तात्पुरत्या स्वरूपात भरली जात आहे.

मूळ तालुक्यातून दुसऱ्या ठिकाणी होऊ शकते नियुक्तीधानोरा तालुक्यात वास्तव्यास असलेल्या सेवानिवृत्त शिक्षकांना अहेरी उपविभागात कोणत्याही तालुक्यात कोणत्याही शाळेत रिक्त असलेल्या जागांवर जि. प. प्रशासनाच्या वतीने नियुक्त्ती देण्यात येणार आहे. २० हजार रुपयांचे मानधनासाठी त्यांना स्वतःचे गाव व कुटुंबांपासून दूर जावे लागणार आहे.

वैद्यकीय प्रमाणपत्र मागविल्याने अडचणवयाचे ६० वर्ष पूर्ण झालेल्या सेवानिवृत्त शिक्षकांना पुन्हा शाळेत सेवा देण्याची संधी दिली जात आहे. यासाठी त्यांना महिन्याला २० हजार रुपयांचे मानधन मिळणार आहे. मात्र अर्ज केलेल्या व इच्छुक शिक्षकांना शिक्षण विभागाच्या वतीने फिटनेस प्रमाणपत्र आवश्यक केले असल्याने शिक्षकांची मोठी गोची झाली आहे. कारण या वयामध्ये अनेक शिक्षकांना बीपी, शुगर, अस्थमा, लकवा, मणक्याचे आजार तसेच इतर कोणते ना कोणते आजार आहेत. त्यामुळे त्यांना आरोग्य विभागाकडून फिटनेस प्रमाणपत्र मिळणे कठीण आहे.

तालुकानिहाय प्राप्त अर्जतालुका                       अर्जधानोरा                           ०४सिरोंचा                           ०६गडचिरोली                      ३०एटापल्ली                       ०२आरमोरी                         २३देसाईगंज                        १६कुरखेडा                         ३५मुलचेरा                          ०५अहेरी                             १२

 

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली