लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली: तेलंगणातून स्वगावी परतलेल्या मिरची तोड मजुरांना स्थानिक नागरिकांकडून वाईट वागणूक मिळत असल्याची परिस्थिती आहे. भेडला गावात तेलंगणातील ७०० ते ८०० मजूर आले होते. त्यांना गावातील विलगीकरण कक्षात १४ दिवसांसाठी ठेवले होते. या कालावधीत त्यांना गावात जाण्याची परवानगी नसल्याने त्यांच्या नातेवाईकाकडून जेवणाचे डब्बे दिले जात होते. मात्र काही मजुरांचे कोणीच नातेवाईक गावात नसल्याने त्यांना रोजचे जेवण मिळण्यात अडचण येत आहे. तसेच विलगीकरण कक्षातील लोकांना भेटलो तर आपल्यालाही कोरोनाची लागण होईल या धास्तीने नागरिक तिकडे जात नाहीत. त्यांनी या कक्षाला काटेरी कुंपणाचा वेढा घातला आहे. तसेच डबे देण्यासाठीही काटेकोर काळजी घेतली जाते. मात्र ज्यांचे कोणीच नाही त्या मजुरांचे खाण्यापिण्याचे मोठे प्रश्न निर्माण झाले आहेत.
गडचिरोली जिल्ह्यात विलगीकरण कक्षात ठेवलेल्या मिरची तोड मजुरांना मिळतेय वाईट वागणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 07, 2020 4:23 PM