शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

गडचिरोली निवडणूक निकाल; डॉ. होळी आणि गजबे यांची सरशी तर आत्राम यांना जनमताचा कौल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2019 19:49 IST

Maharashtra vidhan sabha election Results 2019; भाजपाचे डॉ. देवराव होळी यांनी गडचिरोली मतदारसंघावर आपले प्रभुत्व कायम राखले.

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली: गडचिरोली जिल्ह्यातील विधानसभेच्या तीनही जागा अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राखीव आहेत. या ठिकाणी २०१४ च्या तुलनेत यावेळी भाजपला एक जागा गमवावी लागली तर राष्टÑवादी काँग्रेसने पुन्हा आपल्या गडावर कब्जा करून भाजपकडून ती जागा हिसकावली आहे. भाजपने विद्यमान तीनही आमदारांवर विश्वास टाकत पुन्हा त्यांना निवडणूक रिंगणात उभे केले होते. यापैकी गडचिरोली व आरमोरी येथील उमेदवारांनी पक्षाचा विश्वास सार्थ ठरवत विजय संपादन केला.भाजपाचे डॉ. देवराव होळी यांनी गडचिरोली मतदारसंघावर आपले प्रभुत्व कायम राखले. आरमोरी मतदारसंघातील मतदारांनी यशाचे माप कृष्णा गजबे यांच्या पदरात टाकले. तर धर्मरावबाबा आत्राम यांना जनतेने आपली पसंती दर्शविली.अशी झाली लढतगडचिरोली आणि आरमोरी येथे भाजपचे उमेदवारांची थेट लढत काँग्रेसच्या उमेदवारांशी झाली.आरमोरीत काँग्रेसचे माजी आमदार आनंदराव गेडाम यांना मतदारांनी पुन्हा नाकारले.गडचिरोलीत भाजपसमोर काँग्रेसच्या नवख्या उमेदवार डॉ.चंदा कोडवते टिकल्या नाही.अहेरीत लोकसभा निवडणुकीत भाजपचे मताधिक्य घटले होते. पण राज्यमंत्रीपद गेल्यानंतरही अम्ब्रिशराव यांचे दुर्लक्ष झाले.धर्मरावबाबा यांचा दांडगा जनसंपर्क त्यांच्या कामी आला.अहेरीत काँग्रेसनेही उमेदवार उभा केला, पण तिहेरी लढतीनंतरही काँग्रेस-राकाँ मतविभाजन झाले नाही

टॅग्स :gadchiroli-acगडचिरोलीAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019