आॅनलाईन लोकमतगडचिरोली : प्लास्टिक मल्चिंगवरील भात लागवड आणि सोबतच मत्स्यशेती करणाºया जिल्ह्यातील ११ शेतकऱ्यांचा नाशिक येथील कृषीथॉन प्रदर्शनात सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर येथील ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक डॉ.प्रकाश पवार यांनाही सन्मानित करण्यात आले.राज्याचे जलसंधारण सचिव एकनाथ डवले व नाशिकचे विभागीय आयुक्त महेश झगडे यांच्या हस्ते हा सत्कार करण्यात आला. यावेळी कृषीथॉनचे अध्यक्ष संजय न्याहारकर, धुळेचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश सांगळे उपस्थित होते.गडचिरोलीसारख्या दुर्गम, समस्याग्रस्त जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कृषी क्षेत्रातील ओढ या कार्यक्रमात चर्चेचा आणि औत्सुक्याचा विषय होती.या कार्यक्रमात शेतकरी राजेश वाणी, पुनेश्वर दुधे, सचिन सातपुते, भालचंद्र टिकले, वंदना गावडे, सुनील पवार, अशोक गावडे, अशोकचंद्र कुमरे, कृष्णा गावडे, दीपक दुर्गे तसेच सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक हेमंत उंदीरवाडे व समीर पेदापल्लीवार यांचा सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमानंतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी दिंडोरी तालुक्यातील द्राक्ष व आंबा शेती, हरितगृहातील गुलाबशेती तसेच भाजीपाल्याची आधुनिक, उच्च तंत्र आधारित रोपवाटीका यांची पाहणी प्रकल्प संचालकांच्या मार्गदर्शनात केली.
नाशिकच्या कृषी प्रदर्शनात गडचिरोलीतील शेतकऱ्यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 10:58 PM