लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली:- गोमनी तालुक्यातील खुदीरामपल्ली गावात आज शुक्रवारी सकाळी अस्वलाचे दर्शन झाले. अस्वलाला गावात पाहून लोकांनी एकच गर्दी केली. लोकांची गर्दी बघून अस्वल गावा शेजारी असलेल्या नाल्याजवळच्या झाडावर बसला. त्याला उतरवण्यासाठी वनविभागाचे कर्मचारी सकाळपासून मेहनत घेत आहेत. मात्र अस्वल काही झाडावरून उतरण्याचा नाव घेत नसल्यामुळे वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना कसरत करावी लागत आहे.खुदीरामपल्ली आणि आंबटपल्ली या दोन गावांमध्ये एक मोठा नाला आहे. या नाल्याचा बाजूला असलेल्या मोठ्या झाडावर अस्वल ठाण मांडून बसले आहे. लोकांचा जमाव असल्याने त्याच्या मनात भीती निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. मात्र वनविभागाचे कर्मचारी पिंजरा घेऊन अस्वलाला उतरविण्याचा प्रयत्न करत आहेत. या ठिकाणी दोन्ही गावातील लोकांनी अस्वलाला बघण्यासाठी एकच गर्दी केली आहे.सकाळपासून वनपरिक्षेत्र अधिकारी भाऊसाहेब जव्हरे आणि त्यांची चमू लोकांना अस्वलापासून धोका निर्माण होऊ नये म्हणून जमावाला दूर करण्याचा प्रयत्न करीत आहेत. अस्वल गावात येण्याचा हा पहिलाच प्रकार असून लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाचे कर्मचारी आता काय करणार आणि अस्वल झाडावरून उतरणार काय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एकंदरीत अस्वलाने लोकांच्या आणि वनविभागाच्या कर्मचाऱ्यांच्या नाकीनऊ आणले आहे
झाडावर चढलेल्या अस्वलाला उतरविण्यासाठी गडचिरोली वनविभागाची कसरत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2019 1:55 PM
गोमनी तालुक्यातील खुदीरामपल्ली गावात आज शुक्रवारी सकाळी अस्वलाचे दर्शन झाले. अस्वलाला गावात पाहून लोकांनी एकच गर्दी केली.
ठळक मुद्देलोकांची एकच गर्दीअस्वल काही उतरेना