शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्रि‍पदाचा निर्णय झाला का? बैठकीनंतर एकनाथ शिंदेंनी दिली महत्त्वाची माहिती
2
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी काेण? दिल्ली दरबारी अडीच तास खलबते; २ डिसेंबरला शपथविधी!
3
Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस, काय सांगते तुमची राशी?
4
Tata Sons वर गंभीर आरोप, RBI ला कायदेशीर नोटीस... काय आहे संपूर्ण प्रकरण?
5
उत्तरेतील वारे, महाराष्ट्र गारठला; अनेक शहरांचा पारा आला १५ अंश सेल्सिअसखाली 
6
पदवी अभ्यासक्रम अवधी कमी-जास्त करता येणार; विद्यार्थ्यांसाठी UGC ची नवीन योजना काय?
7
भाजपच्या अभूतपूर्व यशाचे ‘रहस्य’ काय?; 'सागर' बंगल्यावर पडद्यामागे घडलेल्या गोष्टी
8
कुजबुज! निकाल लागले, आचारसंहिता संपली तरीही विजयी मिरवणूक नाही, कारण... 
9
नव्या ‘एलएनजी’ बस मुंबईत धावणार की नाशिकमध्ये?; प्रतिगाडी ५.१५ लाखांचा खर्च अपेक्षित
10
कोस्टल रोडचा खर्च १३०० कोटींनी वाढला; एकूण खर्च गेला १४ हजार काेटींवर
11
धक्कादायक! ‘लिव्ह-इन पार्टनर’चे केले ५० तुकडे अन् प्राण्यांना खाण्यासाठी टाकले
12
समुद्रतळातून काढला तब्बल ३०० किलो प्लास्टिक कचरा; भारतातील पहिलाच प्रयोग मालवणमध्ये यशस्वी
13
जमीन व्यवहारातील फसवणूक आता टळणार; राज्यात 'ॲग्रिस्टॅक' योजना राबवणार
14
‘जात’ जाते कधी, येते कधी?; सर्वोच्च न्यायालयाचा निकाल नवे आकलन देणारा ठरलाय
15
सोशल मीडियाच्या राक्षसाने मुलांना गिळू नये, म्हणून...
16
मलिकांवरील गुन्ह्याच्या तपासाची माहिती द्या; उच्च न्यायालयाचे पोलिसांना निर्देश
17
मनसेच्या पराभूत उमेदवारांना राज ठाकरेंनी दिली उमेद; अडचणी समजावून घेत साधला संवाद
18
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
19
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...

अखेर गडचिरोलीचे मार्केट १५ दिवसांसाठी ‘लॉक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 4:35 AM

जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील झालेल्या या बैठकीत जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांच्यासह विविध विभागांचे ...

जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील झालेल्या या बैठकीत जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. नागरिकांनी कोरोनाला रोखण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी केले. नागरिकांनी विनाकारण बाहेर पडून आपल्यासह इतरांचाही जीव धोक्यात घालू नये असे जिल्हाधिकारी म्हणाले. येणारे १५ दिवस जिल्ह्यातील कोरोना महामारीला थांबविण्यास पुरेसे आहेत. आपण ही संचारबंदी यशस्वी केली तर कोरोना संसर्ग निश्चितच आटोक्यात आणता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सर्व व्यापारी वर्गाने सहकार्य करून संचारबंदी यशस्वी करावी. प्रशासन नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करणार आहेच, परंतु तशी वेळ इतर दुकानदारांनी व नागरिकांनी येऊ देऊ नये, असे जिल्हाधिकारी यांनी म्हटले.

या अत्यावश्यक सेवा राहतील सुरू

- रुग्णालये, रोगनिदान केंद्रे, वैद्यकीय विमा कार्यालये, औषध विक्रेते, इतर वैद्यकीय व आरोग्य सेवा, पशुवैद्यकीय रुग्णालय, अंडी, चिकन, मांस, तसेच जनावरांचा चारा आणि या सर्व बाबींकरिता आवश्यक असलेला कच्चा माल, गोदामे, जीवनावश्यक असलेल्या पशुजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या किराणा मालाची दुकाने, भाजीपाल्याची दुकाने, दूध पुरवठा केंद्रे (दुग्धशाळा), बेकरी, मिठाईची दुकाने, खाद्यान्न दुकाने सुरू राहतील, परंतु पानठेले सुरू ठेवता येणार नाहीत.

- सार्वजनिक परिवहन रेल्वे गाड्या, टॅक्सी, ऑटोरिक्षा व सार्वजनिक बस, स्थानिक प्राधिकरणांद्वारे केली जाणारी मान्सूनपूर्व (पावसाळापूर्व) कामे. स्थानिक प्राधिकरणांद्वारे पुरविल्या जाणाऱ्या सर्व सार्वजनिक सेवा, मालवाहतूक, टेलिकॉम सेवाशी संबंधित देखभाल, दुरुस्तीची कामे, पाणी पुरवठ्याशी संबंधित कामे, कृषी संबंधित सेवा आदी सुरू राहतील.

- अधिस्वीकृत प्रसारमाध्यमे, पेट्रोलपंप, फळ विक्रेते, वकिलांची कार्यालये, विद्युत पुरवठ्याशी संबंधित कामे, इंधन गॅस पुरवठा, बँकांचे एमटीएम, पोस्टल सेवा, पावसाळ्यात आवश्यक असणाऱ्या महत्त्वाच्या साधनसामग्रीशी संबंधित उत्पादने, आपले सरकार केंद्र/सीसीसी/सेतू केंद्र आदी सुरू राहणार आहे. काटेकोर अंमलबजावणी करण्याचे जिल्हा टास्क फोर्सला आदेश

गडचिरोली : जिल्ह्यात झपाट्याने वाढत असलेल्या कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यात १५ दिवस कडक संचारबंदी पाळली जाणार आहे. त्यामुळे अनेक निर्बंधानंतरही गेले दोन दिवस गजबजून गेलेली गडचिरोलीसह जिल्हाभराची बाजारपेठ आता १५ दिवसांसाठी कुलूपबंद झाली आहे. दरम्यान या संचारबंदीच्या कडक अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरावर टास्क फोर्सची निर्मितीही करण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने बैठक घेऊन संचारबंदीच्या अंमलबजावणीबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचना आणि निर्देश दिले.

जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील झालेल्या या बैठकीत जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. नागरिकांनी कोरोनाला रोखण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी केले. नागरिकांनी विनाकारण बाहेर पडून आपल्यासह इतरांचाही जीव धोक्यात घालू नये असे जिल्हाधिकारी म्हणाले. येणारे १५ दिवस जिल्ह्यातील कोरोना महामारीला थांबविण्यास पुरेसे आहेत. आपण ही संचारबंदी यशस्वी केली तर कोरोना संसर्ग निश्चितच आटोक्यात आणता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सर्व व्यापारी वर्गाने सहकार्य करून संचारबंदी यशस्वी करावी. प्रशासन नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करणार आहेच, परंतु तशी वेळ इतर दुकानदारांनी व नागरिकांनी येऊ देऊ नये, असे जिल्हाधिकारी यांनी म्हटले.

या अत्यावश्यक सेवा राहतील सुरू

- रुग्णालये, रोगनिदान केंद्रे, वैद्यकीय विमा कार्यालये, औषध विक्रेते, इतर वैद्यकीय व आरोग्य सेवा, पशुवैद्यकीय रुग्णालय, अंडी, चिकन, मांस, तसेच जनावरांचा चारा आणि या सर्व बाबींकरिता आवश्यक असलेला कच्चा माल, गोदामे, जीवनावश्यक असलेल्या पशुजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या किराणा मालाची दुकाने, भाजीपाल्याची दुकाने, दूध पुरवठा केंद्रे (दुग्धशाळा), बेकरी, मिठाईची दुकाने, खाद्यान्न दुकाने सुरू राहतील, परंतू पानठेले सुरू ठेवता येणार नाहीत.

- सार्वजनिक परिवहन रेल्वे गाड्या, टॅक्सी, ऑटोरिक्षा व सार्वजनिक बस, स्थानिक प्राधिकरणांद्वारे केली जाणारी मान्सूनपूर्व (पावसाळापूर्व) कामे. स्थानिक प्राधिकरणांद्वारे पुरविल्या जाणाऱ्या सर्व सार्वजनिक सेवा, मालवाहतूक, टेलिकॉम सेवाशी संबंधित देखभाल, दुरुस्तीची कामे, पाणी पुरवठ्याशी संबंधित कामे, कृषी संबंधित सेवा आदी सुरू राहतील.

- अधिस्वीकृत प्रसारमाध्यमे, पेट्रोलपंप, फळ विक्रेते, वकिलांची कार्यालये, विद्युत पुरवठ्याशी संबंधित कामे, इंधन गॅस पुरवठा, बँकांचे एमटीएम्स, पोस्टल सेवा, पावसाळ्यात आवश्यक असणाऱ्या महत्त्वाच्या साधनसामग्रीशी संबंधित उत्पादने, आपले सरकार केंद्र/सीसीसी/सेतू केंद्र आदी सुरू राहणार आहे.