लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : राज्याच्या पूर्व टोकावरील शेवटचा लोकसभा मतदार संघ असलेल्या गडचिरोली-चिमूर या मतदार संघाच्या खासदाराचा फैसला गुरूवार दि.२३ रोजी होणार आहे. १५ लाख ८० हजार मतदारांपैकी प्रत्यक्ष मतदान करणाऱ्या ११ लाख ३७ हजार मतदारांचा कौल कोणाला आहे, जुन्याच खासदारांना पुन्हा संधी मिळणार, की नवीन खासदार विराजमान होणार याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.गेल्या ११ एप्रिल रोजी पहिल्याच टप्प्यात या मतदार संघात मतदान झाले होते. त्यानंतर सव्वा महिन्याच्या प्रतीक्षेनंतर उमेदवारांचे भाग्य उघड होणार आहे. अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राखीव असलेल्या या मतदार संघात ५ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. मात्र त्यापैकी विद्यमान खासदार तथा भाजपचे उमेदवार अशोक नेते आणि माजी आमदार तथा काँग्रेसचे उमेदवार डॉ.नामदेव उसेंडी यांच्यातच खरी लढत झाली. याशिवाय या निवडणुकीत रिंगणात असलेले वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार तथा माजी राज्यमंत्री डॉ.रमेशकुमार गजबे, बसपाचे हरिचंद्र मंगाम आणि आंबेडकराईट पार्टी आॅफ इंडियाचे देवराव नन्नावरे यांना किती मते मिळणार याकडेही कार्यकर्त्यांसह मतदारांचे लक्ष लागले आहे.शहरी भाग भाजपबहुल तर ग्रामीण भाग काँग्रेसबहुल अशी स्थिती यावेळी पहायला मिळाली. त्यातल्या त्यात तब्बल ७१.९८ टक्के मतदान झाले. हे मतदान कोणाचे गणित बिघडवणार आणि कोणाचे भाग्य उजळवणार याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे.
गडचिरोलीच्या खासदाराचा आज फैसला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2019 23:36 IST
राज्याच्या पूर्व टोकावरील शेवटचा लोकसभा मतदार संघ असलेल्या गडचिरोली-चिमूर या मतदार संघाच्या खासदाराचा फैसला गुरूवार दि.२३ रोजी होणार आहे. १५ लाख ८० हजार मतदारांपैकी प्रत्यक्ष मतदान करणाऱ्या ११ लाख ३७ हजार मतदारांचा कौल कोणाला आहे,
गडचिरोलीच्या खासदाराचा आज फैसला
ठळक मुद्देमतदार राजाचा फायनल कौल कळणार । सकाळी आठपासून सुरू होणार मतमोजणी । कुणाच्या विजयाचा होणार जल्लोष