गडचिरोली - स्थानिक नगर परिषदेची अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक विशेष सर्वसाधारण सभा नगराध्यक्ष योगीता पिपरे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवार २३ फेब्रुवारी रोजी पार पडली. या सभेमध्ये शहरातील विविध विकास कामाविषयी चर्चा करून २१० कोटीचा अंदाजित अर्थसंकल्प सादर करण्यात
आला.
नगर परिषदेच्या सभागृहात झालेल्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक विशेष सर्वसाधारण सभेत सन २०२०-२०२१ चे सुधारित तर सन २०२१-२०२२ चा २१० कोटी रुपयाचा अंदाजित अर्थसंकल्प सादर करण्यात आला. यामध्ये चौकाच्या सौंदर्यीकरणासाठी ३० लक्ष, दुर्बल घटकांसाठी ४.५ लक्ष, उद्यान सौंदर्यीकरण्याकरिता २० लक्ष, सार्वजनिक वाचनालय व अभ्यासिकासाठी ६ लक्ष, वैशिष्ट्यपूर्ण योजनेसाठी १२ कोटी, वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष निधीकरिता २० कोटी, प्रधानमंत्री आवास योजनेकरिता ५ कोटी, नागरी दलित वस्ती सुधार योजनेकरिता १० कोटी, रस्ता अनुदानाकरिता १.५ कोटी, नगरोत्थान अनुदाना (जिल्हास्तर)साठी १० कोटी, नगरोत्थान योजना (राज्यस्तर) भुयारी गटार योजनेसाठी ६६ कोटी, अग्निशमन सेवा कल्याण निधीकरिता ६८ लक्ष, स्वच्छ महाराष्ट्र अभियानासाठी १ कोटी, जिल्हा नाविन्यपूर्ण योजनेकरिता २ कोटी, स्पेशल रोड ग्रँडकरिता १ कोटी, नागरी दलितेतर वस्ती व सुधार योजनेकरिता ७ कोटी, घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प अनुदानाकरिता १ कोटी, अनुसूचित जाती (नाविन्यपूर्ण) उपाययोजनेकरिता ५० लक्ष, १५ वित्त आयोगांतर्गत घनकचरा व्यवस्थापनाकरिता ३ कोटी ३० लक्ष, १५ वित्त आयोगांतर्गत पाणीपट्टी व वीज बिल भरणा करण्याकरिता २ कोटी, नगरउद्यान सौंदयीकरण/देखभाल-दुरुस्ती करण्यासाठी २० लक्ष, गार्डन चेअर खरेदीसाठी २ लक्ष, इमारत व बांधकामाची दुरुस्ती करण्याकरिता ४५ लक्ष, रस्त्याची दुरुस्ती/नाली दुरुस्ती व किरकोळ कामासाठी ६० लक्ष, सार्वजनिक संडास बांधकाम व दुरुस्तीसाठी ५ लक्ष, चौक सौंदर्यीकरण व शॉपिंग सेंटर दुरुस्ती करण्यासाठी ३० लक्ष, शिक्षण विभागासाठी ७ कोटी २१ लक्ष रुपयाची तरतूद अर्थसंकल्पामध्ये करण्यात आली.
सभेला उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, बांधकाम सभापती प्रवीण वाघरे, सभापती प्रशांत खोब्रागडे, सभापती मुक्तेश्वर काटवे, सभापती वर्षा नैताम, मुख्याधिकारी संजीव ओव्होड, उपमुख्याधिकारी रवींद्र भांडारवार, नगरसेवक प्रमोद पिपरे, रमेश भुरसे, माधुरी खोब्रागडे, रितू कोलते, लता लाटकर, अल्का पोहनकर, वैष्णवी नैताम, नीता उंदीरवाडे, केशव निंबोड, नितीन खोब्रागडे, गुलाब मडावी, अनिता विसरोजवार, सतीश विधाते, रमेश चौधरी, मंजुषा आखाडे, रंजना गेडाम, संजय मेश्राम, पूजा बोबाटे, वर्षा बट्टे उपस्थित होते.