गडचिरोली पोलीस दलाला ‘टेक्नॉलॉजी फॉर पोलिसिंग’ आणि ‘कॉम्प्युनिटी पोलिसिंग इनिशिएटिव्ह’ अशा दोन प्रकारात उत्कृष्ट युनिट म्हणून निवडण्यात आले. एकावेळी हे दोन पुरस्कार मिळण्याची पहिलीचीच वेळ आहे. या सन्मानासाठी पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी जिल्हा पोलीस दलात अतिशय खडतर सेवा बजावत असलेल्या सर्व अधिकारी, अंमलदार यांचे कौतुक केले.
(बॉक्स)
अनेड अडचणींवर मात
गडचिरोली हा नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशील जिल्हा आहे. याशिवाय भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते. तसेच कायदा व सुव्यवस्थेचीही जबाबदारी सांभाळावी लागते. अशाही स्थितीत पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या नेतृत्वात नक्षल हालचालींवर अंकुश ठेवत पोलीस दलाकडून विविध पातळींवर उत्कृष्ट कामगिरी केली जात असल्यामुळे या सन्मानासाठी हा पोलीस घटक पात्र ठरला आहे.