शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे गटाची दुसरी यादी आली; कणकवलीत नितेश राणेंविरोधात 'शॉकिंग' उमेदवार
2
इराणवरच नाही, तर इस्रायलचा इराकवरही हल्ला; एअर डिफेन्स सिस्टिम उडविल्या, कारण काय? 
3
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला,अनेक शहरांवर बॉम्बवर्षाव, इराण प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
4
"१९६७ ला माझ्या बापाने बंडखोरी केली, आमदार झाले; आम्ही काय बंडखोरीच करायची का..?"
5
भारत-चीन सीमेवर दाेन्ही सैन्य माघारीस सुरुवात; २८-२९ ऑक्टाेबरपर्यंत प्रक्रिया हाेणार पूर्ण!
6
Diwali Astro 2024: ही दिवाळी अडलेल्या कामांना गती आणि प्रगती देणारी; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
7
५ ग्रह गोचराने अद्भूत योग: ८ राशींचा भाग्योदय, सुख-समृद्धी; धनलाभ, लक्ष्मी-नारायण शुभ करतील!
8
जान्हवी बिग बॉसमध्ये वापरलेल्या १०० कपड्यांचा लिलाव करणार? अभिनेत्रीने खरं काय ते सांगितलंच! म्हणाली-
9
ना ओटीपी, ना पिन, केवळ Aadhaar नंबरद्वारे झटपट काढता येतील पैसे; सोपी आहे पद्धत
10
आजचे राशीभविष्य: ३ राशींना अनुकूल, आर्थिक लाभ संभवतात; सुखाचा, शांततेचा दिवस
11
घोळ संपेना! मविआचा नवा फॉर्म्युला, तिघांना प्रत्येकी ९० जागा; १८ जागा मित्र पक्षांना
12
मस्का की मस्करी? जगाला ऊठसूट लोकशाही मूल्यांचा डोस देणाऱ्या अमेरिकेत चाललंय काय?
13
मिलिंद देवरा यांना शिंदेसेनेकडून उमेदवारी? वरळीतून आदित्य ठाकरेंच्या विरोधात रिंगणात
14
विशेष लेख: वाट्टेल ते करून लग्न करा, मूल जन्माला घाला! जन्मदर वाढविण्यासाठी नवीन टूम!
15
भ्रष्टाचार निर्मूलन: संवेदनशील सत्यनिष्ठा हवी! काम लवकर होण्यासाठी 'किड' वाढवू नका!
16
ठाण्यात मनसे-महायुती छुपी युती? ठाणे, कल्याण, डोंबिवलीत निवडणूक लढण्याची शक्यता धूसर
17
१३८ कोटींचे सोने पकडले; विशेष चारचाकी वाहनावर पुण्यात कारवाई; कायदेशीर प्रक्रिया सुरू
18
भाजप, शिंदेसेनेच्या तीव्र विरोधामुळे नवाब मलिक यांना अद्याप तरी उमेदवारी नाहीच!
19
विधानसभा निवडणूक: पोलिसांच्या नाकाबंदीत खालापूर टोल नाक्यावर दहा कोटींची चांदी जप्त
20
३६ जागांवर महायुती अन् मविआचेही ‘वेट अँड वॉच’; एकमेकांच्या उमेदवारांची प्रतीक्षा

गडचिरोलीत हातभट्टीच्या दारूअड्ड्यावर धाड, ६.५५ लाखांचा ऐवज जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2020 3:57 PM

सध्या विदेशी दारूचा पुरवठा करणे अशक्य होत असल्यामुळे मद्यशौकिन हातभट्टीच्या दारूवर आपली तलफ भागवत आहेत. त्याचा फायदा घेत मोठ्या प्रमाणात मोहा दारू काढणाऱ्यांच्या अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी धाड टाकली.

ठळक मुद्देएलसीबीची कारवाई ६ कॅन दारू आणि २५ ड्रम सडवा नष्ट

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : सध्या विदेशी दारूचा पुरवठा करणे अशक्य होत असल्यामुळे मद्यशौकिन हातभट्टीच्या दारूवर आपली तलफ भागवत आहेत. त्याचा फायदा घेत मोठ्या प्रमाणात मोहा दारू काढणाऱ्यांच्या अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी धाड टाकली. या कारवाईत दारू, मोहफुलाचा सडवा आणि हातभट्टीचे साहित्य असा ६ लाख ५५ हजार रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त करून दारू व सडवा नाल्यात रिचवला.प्राप्त माहितीनुसार, चामोर्शी तालुक्यातील गुंडापल्ली येथील दारू तस्कर नेपाल हजारी मिस्त्री आणि त्याचे वडील हजारी मिस्त्री यांच्यासह इतर दोन अनोळखी इसम अवैधपणे मोहा दारू काढत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार अपर पोलीस अधीक्षक डॉ.मोहीतकुमार गर्ग यांच्या आदेशान्वये आणि पोलीस निरिक्षक उल्हास भुसारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने गुंडापल्ली गावाच्या जंगल शिवारातील तुंबडी नाल्याच्या काठाने शोध घेतला.यावेळी तिथे ५० लिटर क्षमतेच्या ५ प्लास्टिक कॅनमध्ये भरलेली मोहा दारू, ११ मोठ्या प्लास्टिक ड्रममध्ये भरलेला मोहा सडवा आणि १४ लहान ड्रममध्ये भरलेला मोहा सडवा तसेच एक दुचाकी वाहन असा एकूण ६ लाख ५५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल आढळून आला. मोहा दारू आणि सडवा लगतच्या नाल्यात ओतून नष्ट करण्यात आला. इतर साहित्य जप्त करण्यात आले. पोलिसांच्या येण्याची चाहूल लागल्याने आरोपी घनदाट जंगलात आधीच पसार झाले.ही कारवाई सहायक फौजदार दादाजी करकाडे, हवालदार निळकंठ पेंदाम, महिला पोलीस नायक पुष्पा कन्नाके, सुनील पुठ्ठावार, शुक्राचार्य गवळी, चालक ईश्वर पेंदाम आदींनी केली.

लॉकडाऊनमुळे मोहा दारूला मागणी लॉकडाऊन आणि आंतरजिल्हा सीमाबंदी कडक केल्यामुळे कोणत्याच मार्गाने विदेशी दारूची आयात करणे मद्यतस्करांना अशक्य झाले आहे. परिणामी मोहा दारूची मागणी वाढली आहे. ही गरज भागविण्यासाठी जंगलालगतच्या भागात हातभट्टीची दारू गाळण्याचे प्रमाण वाढले आहे. त्याला आळा घालण्याची जबाबदारी पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकावर सोपविली आहे.

टॅग्स :liquor banदारूबंदी