लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली: येथील पोलीस ठाण्यात कार्यरत एका पोलीस जवानाचा (शिपाई) मंगळवारी सकाळी स्वत:च्या रायफलमधून सुटलेली गोळी लागून मृत्यू झाला. संजीव रामय्या शेट्टीवार (३०) रा.नरहसिंहापल्ली असे मृत जवानाचे नाव आहे.शेट्टीवार मागील दोन वर्षांपासून सिरोंचा पोलीस ठाण्यात शीघ्र कृती पथकात कार्यरत होते. ते आपल्या कुटूंबासह सीआरपीएफ कँम्प परिसरात राहात होते. सकाळी ८ वाजताच्या सुमारास घरी असताना शेट्टीवार आपली रायफल साफ करताना त्यातून गोळी सुटून त्यांच्या हनुवटीखालून डोक्यात घुसली असे सिरोंचा ठाण्याचे निरीक्षक शिवाजी राऊत यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.गोळी लागताच शेट्टीवर जागेवरच कोसळले. गंभीर अवस्थेत त्यांच्यावर सिरोंचा येथील सरकारी रुग्णालयात प्राथमिक उपचार करून वरंगल (तेलंगणा) येथील खासगी रुग्णालयात नेताना त्यांचा मृत्यू झाला. त्यांनी आत्महत्या केल्याची चर्चा सुरू आहे, पण हा अपघात असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.
गडचिरोलीत स्वत:च्या बंदुकीतील गोळीने पोलीस जवानाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2019 11:01 AM
पोलीस ठाण्यात कार्यरत एका पोलीस जवानाचा (शिपाई) मंगळवारी सकाळी स्वत:च्या रायफलमधून सुटलेली गोळी लागून मृत्यू झाला. संजीव रामय्या शेट्टीवार (३०) रा.नरहसिंहापल्ली असे मृत जवानाचे नाव आहे.
ठळक मुद्देआत्महत्या की अपघात?