लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : राज्याचे अल्पसंख्याक मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांच्यावर केंद्रीय एजन्सी ‘ईडी’ने सूडबुद्धीने कारवाई केल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने गुरुवारी इंदिरा गांधी चौकात घोषणा देऊन त्यांच्यावरील कारवाईचा निषेध करण्यात आला. केंद्र सरकारच्या धोरणांचा जे लोक सक्षमपणे विरोध करीत आहेत, त्या लोकांना केंद्रीय तपास यंत्रणेच्या माध्यमातून त्रास दिला जात आहे. ईडीद्वारे लावलेल्या आरोपांमध्ये काही तथ्य नसताना मलिक यांच्यावर कारवाई करण्यात आल्याचे म्हणत निषेधात्मक घोषणा देण्यात आल्या.या वेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, युवक जिल्हाध्यक्ष लीलाधर भरडकर, सेवादलाचे अध्यक्ष प्रभाकर बारापात्रे, जिल्हा उपाध्यक्ष योगेश नांदगाये, जिल्हा सचिव संजय कोचे, जिल्हा सरचिटणीस जगन जांभूळकर, इंद्रपाल गेडाम, प्रमिला रामटेके, विवेक बाबनवाडे, मीनल चिमूरकर, अमोल कुळमेथे, संध्या उईके, आरती कोल्हे, समीर उंदीरवाडे, चेतन गद्देवार, सूरज नांदगावे, प्रमोद गुंड्डावार, अमर खंडारे, प्रा. चंद्रशेखर गडसूलवार, अमोल पवार, सविता चव्हाण, सुषमा येवले, हिमांशू खरवडे, चेतन पेंदाम, सांकेत जंगनावर, रजित रामटेके, आदी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
मलिकांच्या राजीनाम्यासाठी भाजप रस्त्यावर- गडचिरोली : राज्य मंत्रिमंडळातील मंत्री नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्यामुळे नैतिकता म्हणून तसेच कायदेशीर बाब म्हणून त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, या मागणीसाठी गुरुवारी भारतीय जनता पक्षाकडून इंदिरा गांधी चौकात निदर्शने करण्यात आली. मलिक यांनी राजीनामा न दिल्यास आंदोलन अधिक तीव्र करणार असल्याचे जिल्हा महामंत्री प्रमोद पिपरे यांनी जाहीर केले.
- यावेळी पिपरे यांच्यासह किसान आघाडी प्रदेश सदस्य रमेश भुरसे यांच्या नेतृत्वात निदर्शने करण्यात आली. कुख्यात गुंड दाऊद इब्राहीम, त्याचे साथीदार आणि मुंबईतील अंडरवर्ल्डच्या कारवायांशी संबंधित बेकायदेशीर सावकारी प्रकरणात मलिक यांची आठ तास चौकशी केल्यानंतर त्यांना अटक करून त्यांना ३ मार्चपर्यंत ईडीच्या कोठडीत पाठविण्यात आले.
- या आंदोलनाला माजी नगराध्यक्ष योगिता पिपरे, शहराध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, जिल्हा उपाध्यक्ष अनिल पोहनकर, नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, महिला आघाडी शहराध्यक्ष कविता उरकुडे, शहर महामंत्री विनोद देवोजवार, केशव निम्बोड, राजू शेरकी, जनार्धन भांडेकर, भावना गड्डमवार, रूपाली सातपुते तसेच भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.