शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
2
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
3
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
4
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
5
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
6
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
7
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
8
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
9
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
10
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...
11
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
12
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
13
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
14
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
15
राखी सावंतने केली Bigg Boss विजेत्याची भविष्यवाणी; म्हणाली, "नाही जिंकला तर पंख्याला लटकेन..."
16
स्टार ऑलराउंडर ठरला महागडा! ३ चेंडूत दिल्या ३० धावा; नेटकऱ्यांनी केला फिक्सिंगचा आरोप
17
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
18
राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक अधिसूचना जारी; २० डिसेंबरला होणार मतदान
19
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
20
'इंडिया आघाडीला मजबूत नेत्याची गरज', TMC ने राहुल गांधींच्या क्षमतेवर उपस्थित केला प्रश्न

गडचिरोलीवासीयांनी जाणला लालपरीचा संघर्षमय इतिहास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2019 11:38 PM

राज्यातील नागरिकांच्या वातुकीची जबाबदारी सांभाळणाऱ्या एसटीने अनेक स्थित्यंतरे व संघर्ष करीत आजपर्यंतचा टप्पा गाठला आहे. राज्यातील प्रत्येक व्यक्तीच्या मनात एसटीने आपुलकी निर्माण केली आहे.

ठळक मुद्देप्रतिकृतीही ठेवल्या : प्रदर्शनाला शेकडो विद्यार्थ्यांची भेट

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : राज्यातील नागरिकांच्या वातुकीची जबाबदारी सांभाळणाऱ्या एसटीने अनेक स्थित्यंतरे व संघर्ष करीत आजपर्यंतचा टप्पा गाठला आहे. राज्यातील प्रत्येक व्यक्तीच्या मनात एसटीने आपुलकी निर्माण केली आहे. एसटीचा इतिहास राज्यभरातील जनतेला कळावा, या उद्देशाने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ व बस फॉर अस फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘वारी लालपरीची’ हा चित्ररथ तयार केला. सदर चित्ररथ महाराष्ट्रभर फिरत आहे. हा चित्ररथ गडचिरोली येथे १४ आॅगस्ट रोजी दाखल झाला. १६ आॅगस्ट रोजी चित्ररथाचे प्रदर्शन विद्यार्थी व सामान्य नागरिकांसाठी ठेवण्यात आले.या प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी एसटीचे विभाग नियंत्रक अशोककुमार वाडीभस्मे, सांख्यिकी अधिकारी गौरखेडे, सुरक्षा अधिकारी कानफाडे, आगार प्रमुख मंगेश पांडे, बँक संचालक लक्ष्मीकांत चौधरी, रवी बुरले, किशोर लिंगलवार, विलास भुरसे, सुनील खोब्रागडे, विनोद धकाते, जयप्रकाश तनगुलवार, विवेक फाये, रोहिनी पुन्नमवार, सोनी फाये, लता जोगे, माधुरी चिताडे, सरीता सराफ, पवन बासनवार, जे. टी. खोब्रागडे, एम. ए. राठोड, किशोर वानखेडे उपस्थित होते.१९४८ साली पुणे ते अहमदनगर मार्गावर पहिली बस धावली. हळूहळू एसटीचा महामंडळाचा विस्तार वाढत जाऊन संपूर्ण राज्यात विस्तार झाला. एसटी बसगाड्यांमध्ये झालेल्या बदलांची माहिती व प्रतिकृती प्रदर्शनात ठेवल्या होत्या. बस फॉर अस फाऊंडेशनचे रोहित धेंडे, रवी मडगे, सुमेध देशभ्रतार, संयम धाक, सुशांत अवसरे, संजय शिंगाने हजर होते. शेकडो विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन लालपरीचा इतिहास जाणून घेतला.लोकबिरादरीत समारोप‘वारी लालपरीची’ प्रदर्शनाला १ जून २०१९ रोजी मुंबई येथून सुरूवात झाली. राज्यातील ५० पेक्षा अधिक शहरांमध्ये हा चित्ररथ फिरला. राज्याच्या टोकावर असलेल्या भामरागड तालुक्यातील हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्पात प्रदर्शनाचा समरोप होणार आहे.

टॅग्स :state transportएसटी