लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : राजधानी दिल्लीत शुक्रवार दि.१६ पासून आयोजित तीन दिवसीय कृषी उन्नती मेळाव्यात विविध कृषी उत्पादनांचे प्रदर्शन मांडले जाणार आहे. त्यात गडचिरोलीतील ३० शेतकऱ्यांना आपला सेंद्रिय तांदूळ मांडून त्याची विक्री करण्याची संधी मिळणार आहे.केंद्रीय कृषी विभागाच्या वतीने भारतीय कृषी संशोधन संस्था, न्यू पुसा, दिल्ली येथे या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात सहभागी होण्यासाठी गडचिरोली जिल्ह्याच्या सर्व तालुक्यांमधील ३० शेतकरी ५ क्विंटल तांदूळ घेऊन दिल्लीत दाखल झाले आहेत. कृषी विभागाच्या ‘आत्मा’ प्रकल्पांतर्गत सेंद्रीय खताच्या मदतीने शेतकऱ्यांना तांदळाचे उत्पादन घेण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले. त्यानुसार शेतकऱ्यांनी सेंद्रीय खतातून एचएमटी, डीआरके-२ यासह इतर वाणाच्या तांदळाचे उत्पादन घेतले आहे. यापूर्वी मुंबईत आयोजित प्रदर्शनातही या तांदळाला चांगली मागणी होती.यासंदर्भात आत्माचे प्रकल्प संचालक डॉ.प्रकाश पवार यांनी सांगितले की, दिल्लीतील या प्रदर्शनात गडचिरोलीच्या शेतकऱ्यांचा स्वतंत्र स्टॉल राहणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीही या मेळाव्याला हजेरी लावणार आहेत.
दिल्लीतील मेळाव्यात गडचिरोलीचा तांदूळ दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 12:40 PM
राजधानी दिल्लीत शुक्रवार दि.१६ पासून आयोजित तीन दिवसीय कृषी उन्नती मेळाव्यात गडचिरोलीतील ३० शेतकऱ्यांना आपला सेंद्रिय तांदूळ मांडून त्याची विक्री करण्याची संधी मिळणार आहे.
ठळक मुद्देएचएमटी, डीआरके-२ यासह इतर वाणाच्या तांदळाचे उत्पादन