शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता गेली, तर कुत्र पण विचारणार नाही", मुख्यमंत्रिपदाच्या मुद्द्यावरून जयंत पाटलांनी फटकारलं
2
लाडक्या बहिणींना वर्षाला देणार २५००० ; अजित पवारांची घोषणा, जाहीरनाम्यात काय काय?
3
डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या ग्रामीण भागात 'सुपरहिट'; कमला हॅरिस यांचे प्रयत्न कमी पडल्याची चिन्हे
4
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; तुमच्याकडे कारचं ड्रायव्हिंग लायसन्स असेल तर...
5
सुनीता विलियम्स यांच्यासह नासाच्या ३ अंतराळवीरांनी केलं मतदान; स्पेसमधून कसं दिलं जातं मत?
6
"आम्ही मुंब्राच काय, पाकिस्तानात शिवरायांचं मंदिर उभारू", संजय राऊतांचे देवेंद्र फडणवीसांना प्रत्युत्तर
7
सांगोल्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीत फूट; ठाकरेंच्या उमेदवाराला पाठिंबा की शेकापला साथ?
8
त्या घटनेच्या प्रतीला 'लाल' कव्हर, राहुल गांधींना अर्बन नक्षल्यांनी घेरलंय; फडणवीसांचा थेट हल्ला
9
IPL मेगा लिलावात उतरलाय कोच; त्याच्यावर बोली लावत CSK 'सुपर कॉम्बो'चा डाव साधणार? की...
10
Tulsi Vivah 2024 यंदा तुळशीचे लग्न कधी? ‘अशी’ सुरु झाली परंपरा; पाहा, मान्यता अन् महत्त्व
11
Bank Locker Charges : 'या' सरकारी बँकांनी वाढवले बँक लॉकर चार्जेस; आता किती द्यावे लागतील पैसे; तुमचा लॉकर आहे का?
12
मराठमोळी अभिनेत्री दीप्ती देवीचं घटस्फोटावर पहिल्यांदाच भाष्य; म्हणाली, "आजही माझं त्यांच्यावर..."
13
"ना शिवरायांनी सांगितलं, ना बाबासाहेबांनी सांगितलं, हे आत्ता सुरू झालं, कारण..."; 'संत' म्हणत राज यांचा पवारांवर हल्लाबोल
14
"माझा राजकीय अस्त करण्याची व्यूहरचना"; पंकजा मुंडेंच्या पराभवाचा उल्लेख, धनंजय मुंडे काय बोलले?
15
मंगलदेशा, पवित्रदेशा, नातेवाइकांच्याही देशा..., कुटुंबकबिल्याच्या विळख्यात महाराष्ट्राचं राजकारण
16
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या प्रचार सभांचा धडाका; 'या' दिवशी पहिली सभा कोल्हापुरात
17
वृश्चिक संक्रांती: ७ राशींना लाभच लाभ, सरकारी नोकरीचे योग; उत्पन्नात वाढ, पैशांची बचत शक्य!
18
“लोकांची भावना तुतारीकडे…”; भाजपच्या सुरेश धस यांचं वक्तव्य: अजित पवारांवर साधला निशाणा!
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'चं पहिलं पोस्टर समोर! सिनेमाचा सीक्वलही येणार, कधी प्रदर्शित होणार चित्रपट?
20
हसवता हसवता डोळ्यात पाणी आणणारी कहाणी! अभिषेक बच्चनच्या I want to Talk चा भावुक ट्रेलर

गडचिरोलीत मातीच्या कच्च्या झोपडीत भरते शाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2018 1:51 PM

नक्षलग्रस्त आणि आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यात इतर समस्यांप्रमाणेच शिक्षणाची समस्याही गंभीर आहे.

ठळक मुद्देअनुदान फुल्ल मात्र विद्यार्थी आणि सुविधा गुलदुर्गम भागात शिक्षणाची दुरवस्था

रवी रामगुंडेवार ।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : नक्षलग्रस्त आणि आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यात इतर समस्यांप्रमाणेच शिक्षणाची समस्याही गंभीर आहे. दुर्गम भागात शासनाचे पूर्ण अनुदान लाटूनही शिक्षणाच्या नावाने कशी बोंबाबोंब आहे याचा प्रत्यय येमली येथील एका शाळेतील स्थितीवरून येतो. एटापल्ली तालुका मुख्यालयापासून १५ किमी अंतरावर असलेल्या येमली येथे स्वामी विवेकानंदांच्या नावाने असलेल्या हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयाला पक्की इमारत आणि भौतिक सुविधा तर नाहीच, पण विद्यार्थी व शिक्षकसुद्धा गायब राहतात.लोकमतने शनिवारी (दि.२४) या शाळेची प्रत्यक्ष पाहणी केली असता अनेक आश्चर्यकारक बाबी समोर आल्या. प्रबोधिनी बहुउद्देशीय शैक्षणिक मंडळ गडचिरोलीद्वारा संचालित येमली येथील विवेकानंद हायस्कूल २००१ मध्ये सुरू झाले. शासनाने २००७ मध्ये अवघ्या पाच वर्षात या शाळेला १०० टक्के अनुदान लागू केले. मात्र या शाळेत आज कुठल्याही सुविधा नाहीत. मातीच्या कच्च्या झोपडीत शाळा भरविली जाते. सदर शाळेत अनेक भौतिक सुविधांचा अभाव आहे. सदर प्रतिनिधी शाळेला भेट दिली त्यावेळी १०६ विद्यार्थ्यांपैकी एकही विद्यार्थी हजर नव्हते.शाळेला आज १८ वर्ष पूर्ण झाली तरी संबंधित संस्थेने शाळेसाठी स्वतंत्र इमारत बांधली नाही. अवघ्या तीन खोल्यांमध्ये शाळा भरत आहे. सदर शाळेत शौचालय व मूत्रीघरसुद्धा नाही. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नावालाही नाही. शाळा खोलीतच कचऱ्याचे साम्राज्य दिसून आले. खर्रा खाऊन घाण केल्याचेही या शाळेच्या वर्गखोलीत होते. यावरून शाळेची शिस्त काय आहे हे स्पष्ट होते.सदर शाळेत इयत्ता आठवी ते दहावीपर्यंत ५९ विद्यार्थीसंख्या आहे. तर अकरावी व बारावी या दोन वर्गाची मिळून ४७ विद्यार्थीसंख्या आहे. शनिवारी ११.४५ वाजता शाळेची एक वर्गखोली उघडी होती. तीन खोल्या कुलूपबंद होत्या. शनिवारी सकाळी ७.३० ते १०.४० पर्यंत शाळा होती. त्यामुळे शिक्षक घरी गेल्याचे तेथे काही वेळानंतर आलेल्या शिपायाने सांगितले. माध्यमिक शाळा आटोपल्यानंतर कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थी येतात. पण एकही विद्यार्थी तिथे उपस्थित नव्हता. हे कनिष्ठ महाविद्यालय कायम विनाअनुदानित तत्वावर असल्याने येथे उच्च माध्यमिक शिक्षकाचे एकही पद भरण्यात आले नाही. केवळ तासिका तत्वावरील एक शिक्षक देण्यात आला असून सदर शिक्षकही कधी येतो तर कधी शाळेत येत नाही, अशी माहिती ग्रामस्थांनी लोकमतला दिली.काही ग्रामस्थांनी शिक्षक प्रभूदास झाडे यांना बोलवून आणल्यानंतर त्यांनी आज एकही विद्यार्थी शाळेत आला नसल्याचे सांगितले. सदर शाळेला एक मुख्याध्यापक, चार माध्यमिक शिक्षक, एक लिपीक, एक प्रयोगशाळा परिचर, तीन शिपाई अशा एकूण १० कर्मचाऱ्यांची पदे भरण्यात आली आहे. विद्यार्थी आणि शिक्षकच जर गायब राहात असेल तर शाळेचा कारभार केवळ शासनाचा पगार लाटण्यासाठी आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.सदर शाळेचा भोंगळ कारभार पाहता, या शाळेतील विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात असल्याचे दिसून येते. मात्र या गंभीर प्रकाराकडे माध्यमिक शिक्षण विभागाच्या अधिकाºयांचे प्रचंड दुर्लक्ष होत आहे. सदर शाळेत संबंधित संस्थेने विद्यार्थ्यांसाठी संपूर्ण सुविधा द्याव्या, अन्यथा शाळेची मान्यता रद्द करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

गडचिरोलीवरून चालतो कारभारविवेकानंद हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयात कार्यरत माध्यमिक शिक्षक प्रभूदास झाडे हे शाळेच्या गावी येमली येथे निवासी राहून आपले कर्तव्य बजावतात. मात्र इतर सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी एटापल्ली तालुका मुख्यालयावरून येमली येथे अप-डाऊन करतात, असे ग्रामस्थांनी सांगितले.

सदर शाळा संस्थेच्या अध्यक्ष शशिकला संभाजी बागेसर यांचा मुलगा मिलिंद बागेसर हे या शाळेत प्रयोगशाळा परिचर पदावर कार्यरत आहे. ते गडचिरोली येथे राहतात. शाळेत नियमित येत नाही. विशेष म्हणजे, गडचिरोली येथे राहून ते सदर शाळेचा कारभार पाहतात, अशी माहिती येमलीवासीयांनी सदर प्रतिनिधीला दिली.येमली येथील सदर शाळेला आपण यापूर्वी भेट दिली आहे. त्यावेळी या शाळेची स्थिती व्यवस्थित दिसली नाही. सदर शाळेत अनेक सोयीसुविधांचा अभाव दिसून आला. सदर शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकांना शाळेची स्थिती सुधारण्याबाबत सूचना दिली होती. जर संस्थेने अद्यापही शाळेच्या व्यवस्थेत सुधारणा केली नसेल तर या शाळेचा अहवाल शिक्षणाधिकाऱ्यांना पाठविण्यात येईल.- एन. डी. कोकडे, प्रभारी गटशिक्षणाधिकारीपंचायत समिती, एटापल्ली

 

 

 

टॅग्स :Schoolशाळा