लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : दक्षिण कोरिया येथे २४ ते २८ आॅक्टोबरदरम्यान तिसरी जागतिक साकी मार्शल आर्ट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत गडचिरोली येथील विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी करीत विजेतेपद प्राप्त केले. या विद्यार्थ्यांचे गडचिरोली शहरात मंगळवारी आगमन झाल्यानंतर त्यांचा इंदिरा गांधी चौकात स्वागत करण्यात आला.या स्पर्धेत एकूण १९ देशांच्या संघांनी सहभाग घेतला होता. स्थानिक स्कूल आॅफ स्कॉलरच्या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश मिळवित सुवर्णपदकांची कमाई केली. यामुळे शाळेसोबतच जिल्ह्याचेही नाव उंचावले. एन्जल देवकुले हिने दोन सुवर्णपदक, रजत देवकुले, सेजल गद्देवार, अवंती गांगरेड्डीवार, यशराज सोमनानी तसेच संघाचे प्रशिक्षक संदीप पेदापल्ली यांनी सुद्धा सुवर्णपदक पटकाविले.सदर विद्यार्थ्यांची गडचिरोली येथे आगमन झाले. स्कूल आॅफ स्कॉलरचे प्राचार्य निखिल तुकदेव यांनी विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी पर्यवेक्षिका मुमताज लाखानी, क्रीडा मार्गदर्शक सर्वेश वासनिक, सी.एम.चषकचे जिल्हा संयोजक अनिल तिडके, पदाधिकारी निखिल चरडे, तुषार चोपकर, अरबाज खान, रोहित खेडेकर, महेश निलेकर आदींसह एसओएसचे शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
दक्षिण कोरियातील स्पर्धेत गडचिरोलीचे विद्यार्थी चमकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2018 1:03 AM
दक्षिण कोरिया येथे २४ ते २८ आॅक्टोबरदरम्यान तिसरी जागतिक साकी मार्शल आर्ट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत गडचिरोली येथील विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी करीत विजेतेपद प्राप्त केले. या विद्यार्थ्यांचे गडचिरोली शहरात मंगळवारी आगमन झाल्यानंतर त्यांचा इंदिरा गांधी चौकात स्वागत करण्यात आला.
ठळक मुद्देजागतिक स्पर्धा : १९ देशांच्या खेळाडूंचा होता सहभाग