लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : नवरात्र व दसºयाचे औचित्य साधून शनिवारी गडचिरोली पोलीस स्टेशनचा कारभार महिला पोलिसांच्या हातात सोपविण्यात आला होता. आदिवासी समाजातील असलेल्या पोलीस उपनिरीक्षक वर्षा नैताम यांच्याकडे ठाणेदार पदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. सर्वच महिला पोलिसांनी आपापली जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडत आपण पुरूषांपेक्षा कुठेही कमी नाही. हे दाखवून दिले.नवरात्र सणादरम्यान नऊ दिवस आदीशक्तीची आराधना केली जाते. यादरम्यान आदीशक्तीच्या नऊ देवीरूपांचे पूजन केले जाते. नवरात्रीचे औचित्य साधून जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख व अप्पर पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या निर्देशानुसार गडचिरोली पोलीस ठाण्याचा कारभार शनिवारी महिला पोलिसांच्या हातात सोपविण्यात आला. गडचिरोली हे जिल्हा मुख्यालय असलेले पोलीस स्टेशन आहे. गडचिरोली शहराची लोकसंख्या सुमारे ५० हजार एवढी आहे. तालुक्यातील गावांची सुरक्षेचा भारही याच पोलीस स्टेशनवर आहे. नक्षलग्रस्त जिल्हा असल्याने या ठिकाणी काम करणे अत्यंत जोखमीचे आहे. अशाही परिस्थितीत ठाणेदार म्हणून पोलीस उपनिरीक्षक वर्षा नैताम यांनी उत्तम नेतृत्त्व केले. त्यांच्या सोबत एएसआय शालिनी हेमके, पोलीस हवालदार, नीला सिडाम, पोलीस शिपाई दीपिका कुंभारे, शीला कुकुडकर, प्रियंका भानारकर, ज्योती मडावी, लक्ष्मी कोरेटी, मेघा इंदूरकर, सरिता कुळमेथे यांनी विविध जबाबदाºया पार पाडल्या. महत्त्वाचे म्हणजे या सर्वांनी नक्षलवाद निर्मूलनाची शपथ घेतली. या उपक्रमासाठी एसडीपीओ डॉ. सागर कवडे, ठाणेदार संजय सांगळे यांनी पुढाकार घेतला. वर्षा नैताम या २०१० मध्ये महिला पोलीस शिपाई म्हणून पोलीस दलात भरती झाल्या. नोकरी सांभाळतच परीक्षा देऊन त्यांनी पीएसआय पदापर्यंत मजल मारली. २०१३ ते आत्तापर्यंत त्यांनी गडचिरोली पोलीस ठाण्यातील महिलांच्या अनेक तक्रारी सोडविल्या आहेत. पोलीस दलाचे वाहन चालविण्याबरोबरच नक्षलविरोधी अभियानात पुरूष जवानांच्या खांद्याला खांदा लावून लढणाºया जिल्हाभरातील महिला पोलिसांच्या शूरतेचे वरिष्ठ पोलीस अधिकाºयांकडून नेहमीच कौतुक होत आले आहे.आॅनलाईन माहिती पाठविलीसंरक्षणाबरोबरच पोलिसांना दस्तावेजही सांभाळावे लागते. वरिष्ठांना विविध प्रकारची माहिती दिवसभर पाठवावी लागते. गडचिरोली ठाण्याचा कारभार पेपरलेस होण्याच्या मार्गावर आहे. शनिवारी महिला पोलिसांनी संगणकावर विविध बाबींची नोंद घेत वरिष्ठ कार्यालयांना आॅनलाईन माहिती पाठविली. दिवसभर कोणत्याही अडचणींविना काम चालले.
महिला पोलिसांनी सांभाळला गडचिरोली ठाण्याचा कारभार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2017 11:04 PM
नवरात्र व दसºयाचे औचित्य साधून शनिवारी गडचिरोली पोलीस स्टेशनचा कारभार महिला पोलिसांच्या हातात सोपविण्यात आला होता.
ठळक मुद्देनवरात्रीचे निमित्त : गडचिरोली पोलीस दलाचा अभिनव उपक्रम