शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : "बंगालमध्ये पुरामुळे विध्वंस, अनेक जिल्हे बुडाले"; ममता बॅनर्जींनी मोदींना लिहिलं पत्र, मागितली मदत
2
सर्वोच्च न्यायालयाचे यूट्यूब चॅनल हॅक, सगळे व्हिडीओ गायब, काय दिसतंय?
3
FSSAI चौकशी करणार, दोषींवर कारवाई होणार; तिरुपती लाडू वादावर आरोग्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
4
शाळा-कॉलेजात टॉपर, १३ गोल्ड मेडल; सरकारी अधिकारी होण्यासाठी नाकारली परदेशातील नोकरी
5
'...तर आज काश्मीर पाकिस्तानचा भाग असता', मेहबुबा मुफ्ती यांच्या वक्तव्याने नवा वाद
6
एकीकडे सुरक्षेची चिंता, तर दुसरीकडे दुबईत शॉपिंग करताना दिसला सलमान खान; Video व्हायरल
7
'कुछ कुछ होता है' मधील शाहरुखची लेक 'अंजली' आता दिसते अशी, फोटो पाहून तुम्हीही व्हाल थक्क
8
"त्यांच्या तोंडांनाही टाळं लागलंय", PM मोदींनी महाविकास आघाडीवर चढवला हल्ला
9
Haryana Election : "आम्हाला संधी मिळाली तर अधिकारी...", काँग्रेस उमेदवार विनेश फोगाटचा मोठा दावा
10
PAN कार्डासाठी ऑनलाइन अर्ज कसा कराल? अवघ्या काही दिवसांत घरपोच मिळेल
11
दिल्लीतील सहा मंदिरांवर वक्फ बोर्डाने ठोकला दावा, अल्पसंख्याक आयोगाच्या अहवालातून समोर आली माहिती  
12
कसे तयार केले जातात तिरुपतीचे लाडू? 300 वर्षांत 6 वेळा बदलली रेसिपी, वर्षाला होते 500 कोटींची कमाई!
13
पितृपक्ष: तुळस ठरेल भाग्यकारक, ‘हे’ उपाय करा; शुभ-लाभ मिळवा, पितरांसह होईल लक्ष्मी कृपा!
14
मराठा तेवढाच मिळवावा, ओबीसी संपवावा असं मुख्यमंत्र्यांचं धोरण; लक्ष्मण हाकेंचा आरोप
15
पितृपक्षात संकष्टी चतुर्थी: ‘असे’ करा व्रत, गणपती होईल प्रसन्न; पाहा, चंद्रोदय वेळ, मान्यता
16
कोण आहेत न्यायाधीश श्रीशानंद? ज्यांनी मुस्लीम परिसराचा उल्लेख केला पाकिस्तान
17
"माझा तरुण मुलगा गेला, आरोपीला जामीन मिळाला, हा कोणता कायदा?"; आईने फोडला टाहो
18
अब तक ४००! फिरकीच्या बालेकिल्ल्यात बुमराहचा कल्ला; ३ विकेट्स घेताच गाठला मैलाचा पल्ला
19
घडलं असं काही की डिलिव्हरी बॉयने आयुष्यच संपवले; 'सुसाईड नोट'मुळे फुटली वाचा
20
पितृपक्ष: कालसर्प योगाचे चंद्राला ग्रहण, ८ राशींना शुभ काळ; पद-पैसा वाढ, अपार सुख-समृद्धी!

Gadchiroli: दहा लाखांचे बक्षीस असलेल्या दोन जहाल माओवाद्यांना अटक, धोडराजच्या घनदाट जंगलात कारवाई

By संजय तिपाले | Published: July 09, 2024 7:47 PM

Gadchiroli News: निरपराध व्यक्तीचा खून, जाळपोळ, चकमकीसह स्फोट घडवून सुरक्षा यंत्रणावर हल्ला करणाऱ्या दोन जहाल माओवाद्यांना जेरबंद करण्यात पोलिसांना ९ जुलै रोजी यश आले. भामरागड तालुक्यातील धोडराजच्या घनदाट जंगलात अटक केलेल्या या दुकलीवर शासनाचे दहा लाखांचे बक्षीस होते.

- संजय तिपाले

गडचिरोली - निरपराध व्यक्तीचा खून, जाळपोळ, चकमकीसह स्फोट घडवून सुरक्षा यंत्रणावर हल्ला करणाऱ्या दोन जहाल माओवाद्यांना जेरबंद करण्यात पोलिसांना ९ जुलै रोजी यश आले. भामरागड तालुक्यातील धोडराजच्या घनदाट जंगलात अटक केलेल्या या दुकलीवर शासनाचे दहा लाखांचे बक्षीस होते.

माओवादी चळवळीत ॲक्शन टीम कमांडर पदावर काम करणारा रवि मुरा पल्लो (३३,रा. कवंडे ता. भामरागड), भामरागड दलम सदस्य  दोबा काेरके वड्डे (३१,रा. कवंडे ता. भामरागड) अशी त्यांची नावे आहेत. रविवर ८ लाखांचे तर दोबावर महाराष्ट्र शासनाचे दोन लाखांचे बक्षीस होते.

धोडराज हद्दीतील जंगल परिसरामध्ये विशेष अभियान पथक प्राणहिताचे जवान माओवादविरोधी अभियान राबवित होते. यावेळी दोन संशयित माओवादी  धोडराज ठाणे हद्दीत घातपात करण्याच्या उद्देशाने फिरत असल्याची माहिती मिळाल्यावरुन सापळा रचून जंगलातून त्यांना अटक केली.  नोव्हेंबर २०२३ मध्ये पेनगुंडा येथे एका निरपराध व्यक्तीची हत्या झाली होती. यात त्या दोघांचा सक्रिय सहभाग   असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना या गुन्ह्यात अटक करण्यात आली. पोलिस अधीक्षक नीलोत्पल , अपर अधीक्षक यतीश देशमुख , कुमार चिंता , एम. रमेश, उपअधीक्षक (अभियान) विशाल नागरगोजे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली.

दोबावर १८, रविवर ६ गुन्हेदोबा वड्डे हा २००८ पासून हस्तक म्हणून माओवाद्यांसाठी काम करायचा. २०१९ मध्ये तो भामरागड दलममध्ये सदस्य पदावर भरती झाला. त्याच्यावर खुनाचे ७, चकमकीचे ५ व इतर ६ असे एकूण १८ गुन्हे नोंद आहेत. २०२२ मध्ये नेलगुंडातील राजेश आत्राम व २०२३ मध्ये पेनगुंडातील दिनेश गावडे या निरपराध व्यक्तींच्या हत्येत त्याचा प्रत्यक्ष सहभाग होता.  

रवि पल्लो हा २०१६ पासून नक्षल चळवळीशी जोडला गेला. २०१८ पासून ॲक्शन समितीत तो सहभागी झाला. पुढे त्यास टीम कमांडर म्हणून बढती मिळाली. त्याच्यावर ६ गुन्हे नोंद असून त्यात चकमक, जाळपोळीसह स्फोटाचे प्रत्येकी एक व खुनाच्या ३ गुन्ह्यांचा समावेश आहे. 

टॅग्स :naxaliteनक्षलवादीArrestअटकGadchiroliगडचिरोलीCrime Newsगुन्हेगारी