स्वच्छतेची जनजागृती : मुरखळा, डोंगरगाव व कोंढाळात कार्यक्रमगडचिरोली : संपूर्ण राज्यात स्वच्छतेविषयी जनजागृती करण्यासाठी ज्या वाहनातून संत गाडगेबाबा प्रवास करीत होते, ते वाहन गडचिरोली जिल्ह्यात सोमवारी व मंगळवारी येणार आहे. सोमवारी दुपारी १२ वाजता चंद्रपूर जिल्ह्यातून सदर वाहन मुरखळा येथे पोहोचणार आहे. पारडी, कनेरी, पुलखल व जवळपासच्या गावातील नागरिक मुरखळा येथे येऊन या वाहनाचे दर्शन घेणार आहेत. कला पथकाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी जनजागृतीसुद्धा केली जाणार आहे. या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. रात्री सदर वाहन गडचिरोलीतच थांबणार आहे. ८ नोव्हेंबर रोजी आरमोरी तालुक्यातील डोंगरगाव येथे कार्यक्रम घेतला जाणार आहे. त्यानंतर देसाईगंज तालुक्यातील कोंढाळा येथे सायंकाळी ४ वाजता कार्यक्रम होणार आहे. या रथाच्या माध्यमातून संत गाडगेबाबांच्या स्मृती जागृत होण्यास मदत होणार आहे. या रथाच्या दर्शनासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन सीईओ शांतनू गोयल, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत माळी यांनी केले आहे. (प्रतिनिधी)
गाडगेबाबांचे वाहन जिल्ह्यात
By admin | Published: November 06, 2016 1:35 AM