लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : नागरिकत्व सुधारणा कायद्याला समर्थन दर्शविण्यासाठी राष्ट्रीय एकता मंचतर्फे गुरुवारी (दि.२) गडचिरोली आयोजित केलेल्या महारॅलीने शहरवासीयांचे लक्ष वेधून घेतले. या रॅलीनंतर झालेल्या जाहीर सभेत रिमझिम पावसाने व्यत्यय आणला, तरीही मंचावरून नेत्यांची भाषणे सुरूच होती.चंद्रपूर मार्गावरील लॉनवरून निघालेल्या या रॅलीत प्रामुख्याने खासदार अशोक नेते, आमदार डॉ.देवराव होळी, आमदार कृष्णा गजबे, भाजपचे जिल्हाध्यक्ष किशन नागदेवे, सहकार नेते प्रकाश पोरेड्डीवार सहभागी होते.शहराच्या प्रमुख मार्गाने ही महारॅली निघाल्यानंतर लांबलचक तिरंगा हातात घेऊत सहभागी नागरिक चालत होते. विविध घोषणा देत आणि सीएए आणि एनआरसीच्या समर्थनार्थ फलक घेतलेले अनेक नागरिक, महिला, युवक सहभागी झाले होते. रॅलीच्या अग्रस्थानी खुल्या जीपवर तिंरगा ध्वज फडकत होता.यावेळी मार्गदर्शन करताना खासदार अशोक नेते म्हणाले, पंतप्रधान किंवा गृहमंत्री हे एका पक्षाचे राहात नसून ते देशाचे आहेत. त्यांनी देशहितासाठी आणि अंतर्गत सुरक्षेला निर्माण झालेला धोका दूर करण्यासाठी नागरिकत्व सुधारणा कायदा आणला. त्यामुळे कोणत्याही गैरसमजाला बळी न पडता या कायद्याचे समर्थन करा, असे आवाहन त्यांनी केले.यावेळी जि.प.अध्यक्ष योगिता भांडेकर, गडचिरोलीच्या नगराध्यक्ष योगिता पिपरे, देसाईगंजच्या नगराध्यक्ष शालू दंडवते, राष्ट्रीय एकता मंचचे जिल्हाध्यक्ष रामायण खटी, सचिव गोविंद काबरा, राष्ट्रीय स्वयंस्वेवक संघाचे जिल्हा कार्यवाह घिसुलाल काबरा, विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष वामनराव फाये, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष रवी चन्नावार, अभाविपचे जिल्हा संयोजक अंकुश कुनघाडकर, पतंजली योग समितीच्या सुधा सेता, भाजपचे महामंत्री रवी ओल्लालवार, नगरसेवक प्रमोद पिपरे, डॉ.शिवनाथ कुंभारे, हेमंत जंबेवार, गजेंद्र डोमळे आदी उपस्थित होते. माजी गृहराज्यमंत्री हंसराज अहीर हेसुद्धा सभेच्या शेवटी पोहोचले.या महारॅलीसाठी गडचिरोली आणि चामोर्शी तालुक्यातून मोठ्या संख्येने नागरिक आले होते.अन् पावसातही केले मार्गदर्शनखा.अशोक नेते यांचे भाषण अर्ध्यावर आले असतानाच पावसाचे थेंब पडणे सुरू झाले. त्यांचे भाषण संपेपर्यंत रिमझिम पाऊस सुरू झाला होता. पावसामुळे लोक आडोशाला गेले, पण त्यानंतरही आ.डॉ.देवराव होळी यांनी डोक्यावर रूमाल घेत भाषण सुरूच ठेवून सीएए कायद्याची सकारात्मक बाजू समजावून सांगितली.
महारॅलीने वेधले गडचिरोलीकरांचे लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2020 6:00 AM
यावेळी मार्गदर्शन करताना खासदार अशोक नेते म्हणाले, पंतप्रधान किंवा गृहमंत्री हे एका पक्षाचे राहात नसून ते देशाचे आहेत. त्यांनी देशहितासाठी आणि अंतर्गत सुरक्षेला निर्माण झालेला धोका दूर करण्यासाठी नागरिकत्व सुधारणा कायदा आणला. त्यामुळे कोणत्याही गैरसमजाला बळी न पडता या कायद्याचे समर्थन करा, असे आवाहन त्यांनी केले.
ठळक मुद्देसीएएच्या समर्थनार्थ आयोजन : तिरंगा ठरला आकर्षण, जाहीर सभेत रिमझिम पावसाची हजेरी