लोकमत न्यूज नेटवर्कमुलचेरा : उदमांजराची शिकार करणाऱ्या ११ जणांच्या टोळीला पोलिसांनी अटक केली आहे. सदर प्रकरण एफडीसीएमकडे सोपविण्यात आले आहे.मुलचेरा पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरिक्षक मिलिंद पाठक यांच्या नेतृत्वातील पथक २५ जुलै रोजी सकाळी गट्टा परिसरात नक्षल शोधमोहीम राबवून परत येत होते. गट्टा-मुलचेरा मार्गादरम्यान सात दुचाकींवर बसलेले इसम संशयास्पद स्थितीत आढळून आले. त्यांची तपासणी केली असता, त्यांच्याकडे थैलीत उदमांजर, दोन भरमार बंदुका चाकू, टार्च, सुरा आदी शिकारीचे साहित्य आढळून आले. पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता, त्यांचा नक्षलशी कोणताही संबंध आढळून आला नाही. त्यामुळे सदर प्रकरण एफडीसीएम कार्यालय मुलचेरा यांच्याकडे हस्तांतरीत केले. एफडीसीएमच्या अधिकाऱ्यांनी पुन्हा त्यांची चौकशी करून १२ जणांविरोधात गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल झालेल्या आरोपींमध्ये शामराव गोंगलू कोलामी (२९), उमाजी रामजी कुमरे (३५), रामदास शामराव नरोटे (३१), दिवाकर तोंदे तुमरेटी (३०), गुरूदास जगडू जेट्टी (२३), संजय शिवराम तिम्मा (२०), अनिल ऋषी पदा (२५), रमेश केये पदा, संतोष कोमटी तुमरेटी (३२), प्रमोद रैनू कोडापे (३५), गिरीधर मंगरू उसेंडी (३०), करवे डुंगा कोलामी अशी आरोपींची नावे आहेत. यातील ११ जणांना अटक करण्यात आली आहे.यातील करवे हा आरोपी फरार आहे. उदमांजर हा प्राणी टाईप २ मध्ये येते. या सर्व आरोपींना शुक्रवारी चामोर्शी न्यायालयात हजर केले असता, त्यांना तीन दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
उदमांजराची शिकार करणारी टोळी साहित्यासह गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2019 12:12 AM
उदमांजराची शिकार करणाऱ्या ११ जणांच्या टोळीला पोलिसांनी अटक केली आहे. सदर प्रकरण एफडीसीएमकडे सोपविण्यात आले आहे. मुलचेरा पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरिक्षक मिलिंद पाठक यांच्या नेतृत्वातील पथक २५ जुलै रोजी सकाळी गट्टा परिसरात नक्षल शोधमोहीम राबवून परत येत होते.
ठळक मुद्देतीन दिवसांचा एमसीआर : भरमार बंदुका व सात दुचाकी जप्त