जामगिरीत कार्यक्रम : संयुक्त वन व्यवस्थापन समितीचा पुढाकारचामोर्शी : संयुक्त वनव्यवस्थापन समिती जामगिरीच्या वतीने तालुक्यातील जामगिरी येथील ग्रामपंचायत सभागृहात आमदार डॉ. देवराव होळी यांच्या हस्ते २७ लाभार्थी कुटुंबांना वन विभागामार्फत गॅसचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी जामगिरीच्या सरपंच रेखा कोवे, वन परिक्षेत्राधिकारी धोंगडे, माजी सरपंच भैय्याजी वाढई, उपसरपंच डोर्लीकर, पांडुरंग वाढई आदी मान्यवर उपस्थित होते. राज्य शासनाच्या वतीने वन विभागामार्फत जंगलालगतच्या गावातील कुटुंबांना मोफत गॅस कनेक्शन दिले जात आहे. आतापर्यंत शेकडो लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. शिवाय सदर गॅस योजनेंतर्गत सिलिंडर रिफीलींगची व्यवस्था योग्यरित्या करण्यात आली. त्यामुळे जंगलावरील भार कमी झाला, असे आमदार डॉ. होळी यांनी सांगितले. कार्यक्रमाला बालाजी राऊत, गुरूदास वाढई, जयसुक माहोडकर, खुशाल गेडाम, संतोष रंगारी, यशवंत कुळमेथे आदीसह बहुसंख्य नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वनक्षेत्र अधिकारी एस. सी. गुरनुले, आर. डी. तोकला, वनाधिकारी पी. आर. अलोणे, कायत यांच्यासह चामोर्शी वन परिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या बिटातील वनकर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)
२७ लाभार्थ्यांना गॅसचे वाटप
By admin | Published: October 02, 2016 2:14 AM