शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
3
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
4
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
5
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
6
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
7
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
8
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
9
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार
10
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
11
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
12
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
13
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
14
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
15
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
16
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
17
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
18
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
19
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
20
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या

गॅस सिलिंडर पुन्हा २५ रुपयांनी वाढले, आता माेजा ९१६ रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 4:42 AM

दाेन वर्षांपूर्वी गॅसचा वापर केवळ शहरातीलच नागरिक करत हाेते. ग्रामीण भागातील एखादाच कुटुंब गॅसचा वापर स्वयंपाकासाठी करत हाेता. मात्र, ...

दाेन वर्षांपूर्वी गॅसचा वापर केवळ शहरातीलच नागरिक करत हाेते. ग्रामीण भागातील एखादाच कुटुंब गॅसचा वापर स्वयंपाकासाठी करत हाेता. मात्र, उज्ज्वला याेजनेंतर्गत शासनाने ग्रामीण भागातही गॅस सिलिंडरचे वितरण केले. त्यामुळे ९० टक्के घरांमध्ये आता गॅस पाेहाेचला आहे. सिलिंडरसाठी काेणतेही अनामत रक्कम न ठेवता गॅस कनेक्शन उपलब्ध हाेत हाेते. त्यामुळे अनेकांनी गॅस घेतला. आता मात्र सातत्याने किमती वाढत असल्याने गॅस भरण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. ग्रामीण भागातील दाेन व्यक्तीच्या कुटुंबाला एक हजार रुपयांचा किराणा लागत नाही. अशा स्थितीत गॅससाठी हजार रुपये कसे काय भरायचे, असा प्रश्न नागरिकांसमाेर निर्माण झाला आहे.

बाॅक्स

सबसिडी बंद, दरवाढ सुरूच

- दाेन वर्षांपूर्वी शासनाकडून २०० रुपयांपर्यंत सबसिडी दिली जात हाेती. त्यामुळे एखाद्या ग्राहकाने ५०० रुपयांचा सिलिंडर खरेदी केला तरी प्रत्यक्षात त्याला ताे सिलिंडर केवळ ३०० रुपयांना पडत हाेता. आता मात्र, सिलिंडरची सबसिडी केवळ ४० रुपयांवर आली आहे.

- सिलिंडरची किंमत वाढत असताना सबसिडी मात्र ३० रुपये कायम ठेवली आहे. अनेकांना ही सबसिडी सुद्धा जमा हाेत नाही.

व्यावसायिक सिलिंडर ५ रुपयांनी स्वस्त

घरगुती सिलिंडरची किंमत वाढवत असतानाच १९ किलाे वजनाचे व्यावसायिक कारणासाठी वापरले जाणारे सिलिंडर पाच रुपयांनी स्वस्त झाले आहे पूर्वी या सिलिंडरची किंमत १७६३ रुपये हाेती. आता ही १७५८ रुपये झाली आहे.

पाच किलाेंचे सिलिंडर ३ रुपयांनी स्वस्त

काही व्यावसायिक पाच किलाेचे सिलिंडरही वापरतात. हे सिलिंडर घरगुती व व्यावसायिक कामासाठी सुध्दा वापरता येते. याची किंमत पूर्वी ५३१ रुपये हाेती. १७ ऑगस्टपासून ती किंमत ५३४ रुपये झाली आहे.

लहान सिलिंडरच्या किमतीमध्ये सुध्दा वाढ

पाच किलाे वजनाचे घरगुती व व्यावसायिक सिलिंडरसुद्धा उपलब्ध करून दिले जाते. या सिलिंडरच्या किमतीमध्येसुद्धा वाढ झाली आहे. १ एप्रिलला या सिलिंडरची किंमत ३३९ रुपये हाेती. ती वाढून १ जुलै राेजी ५०६ रुपये झाली आहे. १७ ऑगस्टला किंमत कायम आहे.

- व्यावसायिक वापराच्या पाच किलाे वजनाच्या सिलिंडरची किंमत ५१२ रुपये हाेती. १ जुलै राेजी किंमत वाढून ५०६ रुपये झाली असून हिच किंमत अजूनही कायम आहे.

काेट

शहरात चुली कशा पेटवायच्या

गॅस सिलिंडरच्या वाढत्या किंमती लक्षात घेऊन ग्रामीण भागातील कुटुंब पुन्हा चुलीवरच स्वयंपाक करत आहेत. ग्रामीण भागात सरपण उपलब्ध हाेऊ शकते. मात्र, शहरात कुठून सरपण आणणार. त्यामुळे गॅसची किंमत कितीही वाढली तरी गॅसवरच स्वयंपाक करावा लागणार आहे.

- मायाबाई शेंडे, गृहिणी

गॅस सिलिंडर हे अत्यावश्यक गरजेमध्ये माेडणारी वस्तू झाली आहे. त्यामुळे शासनाने गॅसवर जास्त प्रमाणात सबसिडी देण्याची गरज आहे. एक हजार रुपयांचा सिलिंडर खरेदी केल्यानंतर महिन्याचा बजेट बिघडत चालला आहे. शासनाने लक्ष देण्याची गरज आहे.

- कविता उसेंडी, गृहिणी

आठ महिन्यांत १६६ रुपयांची वाढ

महिना

जानेवारी ७५०

फेब्रुवारी ८५३

मार्च ८४६

एप्रिल ८४६

मे ८६५

जून ८६५

जुलै ८९१

ऑगस्ट ९१६