शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
3
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
4
मणिपूरच्या असह्य वेदना; बिरेन सिंह सरकारबद्दल निर्णय घेण्याची गरज!
5
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
6
तिकडे डोनाल्ड ट्रम्प.. आणि इकडे नरेंद्र मोदी
7
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
8
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
9
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
10
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
11
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार
12
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
13
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
14
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
15
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
16
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
17
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
18
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
19
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
20
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल

गॅस सबसिडी योजनेने मध्यमवर्गीय कुटुंब पुन्हा चिंतेत

By admin | Published: November 19, 2014 10:39 PM

गतवर्षी युपीए सरकारने गडचिरोली जिल्ह्यात गॅस सिलिंडरवर थेट अनुदान योजना सुरू केली होती. या योजनेत गॅस सिलिंडर खरेदीसाठी ग्राहकाला आधी आपल्याजवळचे पैसे द्यावे लागत होते.

गडचिरोली : गतवर्षी युपीए सरकारने गडचिरोली जिल्ह्यात गॅस सिलिंडरवर थेट अनुदान योजना सुरू केली होती. या योजनेत गॅस सिलिंडर खरेदीसाठी ग्राहकाला आधी आपल्याजवळचे पैसे द्यावे लागत होते. त्यानंतर त्याच्या सबसिडीची रक्कम बँक खात्यावर जमा होत होती. या योजनेत सिलिंडर हे १२०० ते १४०० रूपये किंमतीचे होते. त्यामुळे मध्यमवर्गीय व निम मध्यमवर्गीय नागरिकांना सिलिंडर खरेदीसाठी प्रचंड आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत होता. काहींना इतरांकडून रक्कम गोळा करून सिलिंडरसाठी आर्थिक सोय करावी ठेवावी लागण्याचीही पाळी आली होती. त्यामुळे मध्यमवर्गीय कुटुंबांनी या काळात सिलिंडरची उचलही केली नाही, असे चित्र बरेचवेळा दिसून आले. आता केंद्र सरकारने पुन्हा १ जानेवारी २०१५ पासून गडचिरोली जिल्ह्यात गॅस सिलिंडरवर थेट सबसिडी योजना लागू केली आहे. अशी घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे पुन्हा मध्यमवर्गीय गॅस ग्राहक धास्तावलेला आहे. या योजनेत सिलिंडरचे दर विद्यमान स्थितीपेक्षा जास्त राहतात व पूर्ण सिलिंडरची सबसिडी वजा रक्कम भरून सिलिंडर घ्यावे लागते. सिलिंडरसाठीची १४०० रूपयांची रक्कम जुळवून ठेवणे अनेक कुटुंबांना अवघड जाणारे आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.आजकाल गॅस सिलिंडर हे हमाली व्यवसाय करणाऱ्या कुटुंबापासून ते घरगुती भांडे घासणाऱ्या महिलांसह स्लम भागातील नागरिकांकडेही आहे. अशा नागरिकांना ४६० रूपये सध्य:स्थितीत सिलिंडरसाठी जमा करणे सहज शक्य होऊन जाते. या रकमेची तरतूद हे कुटुंब आधीच करून ठेवतात. परंतु अनुदानावरच्या योजनेत १४०० रूपयांचे सिलिंडर घ्यावे लागते. त्याची रक्कम गॅस वितरकाला द्यावी लागते. त्यानंतर एक ते दोन दिवसांनी किंवा आठ दिवसापर्यंत अनुदानाची रक्कम सदर ग्राहकाच्या खात्यावर जमा होते. त्यामुळे जवळचे पैसे निघून जातात. अशावेळी अनेक गॅस ग्राहकाला अडचणीत इतरांकडून रक्कम घेऊन सिलिंडर घेण्याची सोय करावी लागते.शहरात काही ग्राहकांकडे दुसऱ्याच्या नावाचे गॅस कनेक्शनही आहे. त्याच्या कागदपत्राच्या आधारे सिलिंडरची उचल केली जाते. अशावेळी १४०० रूपये सिलिंडरसाठी गुंतवल्यावर अनुदानाची रक्कम ज्याच्या नावाने सिलिंडर आहे, त्याच्या बँक खात्यावर जमा होते. तो व्यक्ती ती रक्कम भरणाऱ्याला देण्यास बरेचदा टाळाटाळही करतो. त्यामुळे नियमितपणे गॅस वापरणाऱ्या अशा ग्राहकांवर एक नवे संकट या निमित्ताने उभे राहते. युपीए सरकारच्या काळात थेट अनुदान योजनेतून या अडचणी समोर आल्या होत्या. गॅसच्या किंमतीही एकाच जिल्ह्यात विविध तालुक्यात वेगवेगळ्या राहण्याचाही प्रकार घडला होता. त्यामुळे पुन्हा ही योजना लागू होणार म्हटल्याने मध्यमवर्गीय गॅस ग्राहक सध्या धास्तावलेल्या व चिंतेच्या अवस्थेत आहे. (जिल्हा प्रतिनिधी)