लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली पंचायत समितीची आमसभा आमदार डॉ. देवराव होळी यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी चामोर्शी मार्गावरील जि.प. हायस्कूलनजीकच्या सभागृहात पार पडली. घरकूल रोहयोंतर्गत नरेगाचे रस्ते, विद्युत खांब, बंद बसफेरी आदीसह आरोग्य, जि.प. बांधकामासह इतर विभागांच्या कारभाराचीग मुद्यांवर या सभेत वादळी चर्चा झाली.यावेळी मंचावर पं.स. सभापती मारोतराव इचोडकर, उपसभापती विलास दशमुखे, नगराध्यक्ष योगीता पिपरे, नगरसेवक प्रमोद पिपरे, पं.स. सदस्य रामरतन गोहणे, संवर्ग विकास अधिकारी सुनिता म्हरस्कोल्हे, नायब तहसीलदार किरमे आदी उपस्थित होते.सदर आमसभा दुपारी १ वाजतानंतर सुरू झाली. ग्रामपंचायतींना ग्रामसेवकांच्या हजेरीसाठी बायोमेट्रिक मशीन बसविण्यात आल्या आहेत. मात्र बºयाच ठिकाणच्या मशीन बंद स्थितीत असल्याने ग्रामसेवकाचे चांगलेच फावले आहे. ग्रामपंचायतीच्या विकासकामाकडे काही ग्रामसेवकाचे दुर्लक्ष होत असल्याचा मुद्दा तालुक्यातील काही सरपंच व उपसरपंचांनी उपस्थित केला. यावर गडचिरोली तालुक्यातील किती ग्रामपंचायतीच्या बायोमेट्रिक मशीन सुरू आहेत वा किती बंद आहेत, याबाबतची संपूर्ण माहिती घ्यावी. मशीन बंद असल्यास संबंधित दोषींवर कारवाई करावी, असे निर्देश आमदार डॉ. देवराव होळी यांनी बीडीओ म्हरस्कोल्हे यांना यावेळी दिले.अमिर्झा-चांभार्डा ही बसफेरी सुरू करण्यात आली होती. मात्र अल्पावधीतच ही बसफेरी बंद करण्यात आली. त्यामुळे चांभार्डा परिसरातील प्रवाशांची अडचण होत आहे, असा मुद्दा योगेश कुडवे व इतर कार्यकर्त्यांनी आमसभेत उपस्थित केला. यावर पुन्हा ही बसफेरी सुरू करण्यात येईल, अशी ग्वाही आमदार डॉ. होळी यांनी दिली.गेल्या वर्षभरापासून आवश्यक असलेल्या गावांमध्ये महावितरणच्या वतीने लोखंडी वीज खांबाचा पुरवठा झाला नाही. डिमांड भरूनही २०१८ पासून अनेकांना वीज मीटर मिळाले नाही, असा मुद्दा माजी पं.स. सदस्य अमिता मडावी यांनी आक्रमकपणे मांडला. यावर आमदारांनी महावितरणच्या अभियंत्यांकडून माहिती जाणून घेतली व समस्या लवकर मार्गी लावण्याचे निर्देश दिले.पोटेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टरांचे पद रिक्त आहे. येथे एमबीबीएस डॉक्टर नाही. त्यामुळे रूग्णांची हेळसांड होत असल्याचा मुद्दा या सभेत उपस्थित करण्यात आला.बीडीओ म्हरस्कोल्हे यांच्याकडून पंचायत समितीचा भोंगळ कारभार सुरू आहे. आमदारांनी बीडीओंना पाठीशी घालू नये. अधिकारी हे जनतेचे काम करण्यासाठी असतात, असे नगराध्यक्ष योगीता पिपरे, प्रतिभा चौधरी व अमिता मडावी यांनी ठणकावून सांगितले. नादुरूस्त व जीर्ण शाळा इमारती, आदिवासी विकास विभागाकडून उपलब्ध होणारे पीव्हीसी पाईप आदी मुद्यांवर चर्चा करण्यात आली.जि.प. बांधकाम उपविभाग गडचिरोलीचा प्रभार एस.पी. फाले यांच्याकडे देण्यात आला आहे. मात्र त्यांचे काम योग्य नसल्याचा आरोप करत त्यांच्याकडून उपविभागीय अभियंत्याचा प्रभार काढून टाकावा, अशी मागणी शिवसेनेचे पदाधिकारी अरविंद कात्रटवार यांनी आमदारांकडे केली. सदर अभियंत्याच्या कारभाराविरोधात कात्रटवार यांनी आक्रमक पवित्रा घेऊन आपल्या भावना सभेत मांडल्या.ओबीसी जनगणनेचा ठराव पारितदेशात जनावरांची गणना होते. मात्र ओबीसींची स्वतंत्ररित्या जनगणना केली जात नाही. त्यामुळे ओबीसींवर अन्याय होत आहे. ओबीसींना सोयीसवलतीचा खऱ्याअर्थाने लाभ मिळण्यासाठी सन २०२१ मध्ये ओबीसीची स्वतंत्र जनगणना करण्यात यावी, असा प्रस्ताव गडचिरोली पंचायत समितीचे उपसभापती विलास दशमुखे यांनी मांडला. या प्रस्तावाला उपस्थित मान्यवरांसह सर्वांनीच सकारात्मक प्रतिसाद दिल्याने हा ठराव एकमताने पारीत करण्यात आला. त्यानंतर उपस्थित सर्व कर्मचारी व नागरिकांनी टाळ्या वाजवून दाद दिली.रोहयोअंतर्गत पांदण रस्त्यांची कामे थंडबस्त्यातरोजगार हमी योजनेंतर्गत गेल्या दोन वर्षांपासून पांदण रस्त्यांची कामे थंडबस्त्यात आहेत. गडचिरोली तालुक्याच्या अनेक ग्रामपंचायतीमध्ये आवश्यक असलेले पांदण रस्त्याचे काम सुरू करून मजुरांना रोजगार द्यावा. गडचिरोली तलुक्यात अनेक गरीब, गरजू कुटुंब घरकुलाच्या प्रतिक्षेत आहे. मात्र या तालुक्यासाठी अतिशय कमी उद्दिष्ट येत असल्याने मोठी अडचण झाली आहे. हे उद्दिष्ट वाढवून गरजूंना हक्काचे घर द्यावे, अशी आग्रही मागणी कनेरीचे सरपंच संजय निखारे यांनी या सभेत केली.खराब साऊंड सिस्टीममुळे सभेत गोंधळसदर आमसभेत वापरण्यात आलेले साऊंड सिस्टीम व माईक खराब असल्याने प्रश्न मांडणाऱ्यांचे व ऐकून घेणाºया मान्यवरांमध्ये अपेक्षित समन्वय साधता आला नाही. शेवटच्या नागरिकांना प्रश्न समजले नाही. खराब साऊंड सिस्टीममुळे बºयाचदा या सभेत गोंधळाची स्थिती निर्माण झाली. दरम्यान पं.स.चे माजी सदस्य अमिता मडावी, भाजपच्या नवेगाव येथील पदाधिकारी प्रतिभा चौधरी यांनी आक्रमक पवित्रा घेत माईक खाली फेकून दिला. याप्रती उपस्थित नागरिकांनी आयोजक अधिकाºयांवर नाराजी व्यक्त केली.
घरकूल, पांदण रस्त्यांवर गाजली सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2020 6:00 AM
यावेळी मंचावर पं.स. सभापती मारोतराव इचोडकर, उपसभापती विलास दशमुखे, नगराध्यक्ष योगीता पिपरे, नगरसेवक प्रमोद पिपरे, पं.स. सदस्य रामरतन गोहणे, संवर्ग विकास अधिकारी सुनिता म्हरस्कोल्हे, नायब तहसीलदार किरमे आदी उपस्थित होते. सदर आमसभा दुपारी १ वाजतानंतर सुरू झाली.
ठळक मुद्देआमदारांकडून कारवाईचे निर्देश : सरपंच, उपसरपंचासह व सामाजिक पदाधिकाऱ्यांचा आक्रमक पवित्रा